
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. खूप दिवसांनी या सिनेमाच्या निमित्ताने महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी सलमान खानबद्ल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे. बॉलीवूडचा दबंग किंवा भाईजान अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे सलमान खान. महेश मांजरेकर मराठी सिनेसृष्टीप्रमाणेच हिंदीत देखील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर मांजरेकर आणि सलमान खानची मैत्री किती घनिष्ठ हे देखील इंडस्ट्रीला माहित आहे.
मांजरेकरांनी सलमान खानबरोबर देखील काम केलं आहे. दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री असताना देखील ‘मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही’ महेश मांजरेकर सलमान खान बाबत असं का म्हणाले? तर झालं असं की, ‘पुन्हा एकदा शिवाजीराजे’ मांजरेकरांच्या या आगाामी सिनेमाबाबत त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखता दिली. सिनेमाविषयीच्या गप्पा सुरु असताना मांजरेकरांना सलमान खान आणि त्यांच्या मैत्रीबाबचे प्रश्न विचारले गेले. त्यावेळी मांजरेकरांनी सांगितलं की, सलमान खान हा सिनेसृष्टीतील माझा खूप चांगला मित्र आहे. कोणत्याही इव्हेंटमध्य़े मी त्याला बोलवलं तर तो कधीच नाही म्हणत नाही. मला वेळ नाही किंवा मला जमणार नाही अशी कारणं तो कधीतच देत नाही. कधीही त्याला बोलवलं तर तो माझ्यासाठी वेळ काढतो इतकी आमची मैत्री खास आहे.
यापुढे मांजरेकर असंही म्हणाले की, मी सलमानबरोबर ‘अंतिम’ सिनेमा केला होता. पण त्या सिनेमानंतर मी ठरवलं की पुन्हा याच्याबरोबर काम करायचं नाही. सलमानचे वडिल निर्माते आहेत त्यामुळे त्याला असं वाटतं की, सिनेमा त्याला कळतो आणि त्याच्यात देखील एक चांगला दिग्दर्शक आहे जे त्याला वाटतं. पण माझं त्यावेळी म्हणणं असं होतं की, दिग्दर्शक म्हणून सिनेमा मला दिला आहेस ना मग मला ठरवूदेत काय करायचं ते. मांजरेकरांनी पुढे असंही सांगितली की, जेव्हा त्यांची कॅन्सवर शस्त्रक्रिया झालेली तेव्हा त्यांना काही दिवस बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्यावेळी इंडियन आयडलचे काही स्पर्धक त्यांच्या घरी आलेले आणि गाण्यांची मैफिल रंगली होती. त्यावेळी मला पहाटे तीन वाजता सलमान खानचा फोन आलेला आणि त्याच्यावर मी खूप चिडलो होतो. त्यावर तो म्हणाला की, तू मला शिवी दिलीस का ? तर मी त्याला म्हणालो की शिवी तुला नाही तुझ्यातल्या दिग्दर्शकाला होती.
सलमान खान दिग्दर्शक म्हणून कसाही असला तरी माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात मला तो मदत करतो माझ्याबरोबर असतो. आमच्यात भांडणं असली तरी आमच्या मैत्रीवर याचा कोणताही परिणाम कधीही होणार नाही, असं सलमान खानच्या मैत्रीबाबत महेश मांजरेकर .यांनी सांगितलं.