Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी पुन्हा बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज, आगामी चित्रपटाचा पोस्टर रिलीज

आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यात मराठी अभिनेत्री आघाडीवर आहेत. या अभिनेत्रींच्या यादीत असलेल्या दीपा परब हिने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर नेहमीच रसिकांचे लक्ष वेधले.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 22, 2025 | 05:46 PM
अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी पुन्हा बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज, आगामी चित्रपटाचा पोस्टर रिलीज

अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी पुन्हा बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज, आगामी चित्रपटाचा पोस्टर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यात मराठी अभिनेत्री आघाडीवर आहेत. या अभिनेत्रींच्या यादीत असलेल्या दीपा परब हिने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर नेहमीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. आता दीपा पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ‘फकिरीयत’ या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत दिसणार असून संतोष मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित, ‘गाडी नंबर १७६०’ मध्ये झळकणार प्रथमेश- प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी

भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपी च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आजवर मराठी सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी प्रथमच हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘फकिरीयत’ हा त्यांचा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी सिनेमा आहे. कोणतीही व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारण्याची कला अंगी असलेल्या दीपा परबने यापूर्वी हिंदी सिनेमात काम केले होते. एका प्रदीर्घ ब्रेकनंतर ती पुन्हा हिंदी भाषिक रसिकांसमोर येणार आहे. दरम्यानच्या काळात तिने बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘फकिरीयत’मध्ये रसिकांना तिच्या अभिनयाचे वेगळे पैलू पाहायला मिळणार आहेत. ‘फकिरीयत’ हा चित्रपट एक युगपुरुष, महापुरुष, महावतार बाबाजी व त्यांचा क्रियायोग यांची खरी ओळख सांगणारा आहे.

 

“ओढ तुझ्या पंढरीची…”, अजय गोगावलेच्या आवाजातलं भक्तिगीत ऐकलंत का ? पालखी प्रस्थानाच्या शुभमुहूर्तावर गाणं प्रदर्शित

बाबाजींच्या एका शिष्येच्या माध्यमातून या सिनेमाची कथा उलगडत जाणार आहे, जी आपले जीवन गुरु इच्छेने जगते, गुरुकार्य जीवनाचे ध्येय समजते, तिला होणारी दैवी दर्शने, येणारे आदेश, होणारा विरोध, तिचा संघर्ष अशा अनेक अद्भुत, अविश्वनीय, रहस्यमय घटना म्हणजे फकिरीयत. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर लिखित पुस्तकांवर आधारित कथा असलेल्या या चित्रपटाचे पटकथालेखन अनिल पवार यांनी केले आहे. संवादलेखन अनिल पवार आणि अनुजा जानवलेकर यांनी केले आहे. अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. समृद्धी पवार यांनी लिहिलेली गीते संगीतकार प्रवीण कुंवर यांनी मनीष राजगिरे, मनोज मिश्रा, जसराज जोशी, नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतबद्ध केली आहेत. या सिनेमात दीपा परब, विनीत शर्मा, संतोष जुवेकर, उदय टिकेकर, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनिशा सबनीस आदी कलाकार आहेत.

Web Title: Marathi actor ankush choudhary wife deepa choudhary debut bollywood industry first movie poster released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • bollywood movies
  • marathi actress
  • Television Actress

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
2

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
3

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

सलमान खान नाही तर ‘अब्दुल रशीद…’! प्रसिद्ध अभिनेत्यांची खरी नावे
4

सलमान खान नाही तर ‘अब्दुल रशीद…’! प्रसिद्ध अभिनेत्यांची खरी नावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.