Kutumb Kirtan: प्रशांत दामले रंगमंचावर पुन्हा एकदा धमाल करणार, कोरं करकरीत नाटक येतंय, कधी अन् कुठे?
नंदकुमार पाटील
प्रशांत दामले हे फक्त अभिनेते नाहीत तर ते निर्माते सुद्धा आहेत. विशेष म्हणजे नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नाटकात काम करणे, त्याची निर्मिती करणे या प्रक्रियेला त्यांनी अधिक वेळ दिलेला आहे. ते सहभागी असलेल्या नाटकाची निर्मिती करतातच पण त्याचबरोबर त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या आपल्या कलाकारांसाठी सुद्धा त्यांनी नाटकाची निर्मिती करणे महत्त्वाचे मानलेले आहे. याच महिन्यात त्यांचे नवे कोरे करकरीत ‘कुटुंब कीर्रतन’ नाटक व्यावसायिक रंगमंचावर येत आहे. धमाल विनोदी असणार हे वेगळे सांगायला नको. विनोद रत्ना यांची कथा असून संकर्षण क-हाडे यांनी त्याचे लेखन केले आहे. अमेय दक्षिणदास है या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. या महिन्याच्या २१ तारखेला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. २४ मार्च सोडली तर सलग २७ तारखेपर्यंत मुंबईत ध ध धमाल हे नाटक करणार आहे.
प्रशांत दामले
स्वरांची जादू ही दाखवून दिली आहे. ही स्वरगाथा डायरेक्ट स्टेजवरच त्यांनी व्यक्त केलेली नाही. अगदी सुरुवातीला शाहीर साबळे यांच्या गाणं समूहात, कला पथकात त्यांच्या त्यांचा सहभाग होता. पुढे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये स्वतःला अनुभवत असताना तो उत्तम कलाकार आहे हे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला त्यांच्या पुढच्या नाटकात घेतले. तो सुधीर भट यांच्या सुयोग थिएटरचा हक्काचा कलाकार झाला. नाटक कुठलेही असो त्यात प्रशांत असायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा अर्थात त्याला कारण सुद्धा आहे.
वेळ काळ पाळणारा, गाण्याचे ज्ञान, विनोदाचे अचूक टाइमिंग, घेतलेले काम नेटाने करणे आणि आपली बांधिलकी ही प्रेक्षकांची आहे असे समजून पूर्णपणे नाटकात समरस होणे या साऱ्या गोष्टीमुळे प्रशांत दामले ग्रेट अभिनेता आहे हे प्रेक्षकांनीच ठरवून टाकले होते. त्यामुळे महाराष्ट्रात, भारतात तुफान गर्दी मिळवणारी ही निर्माता, गोड गळ्याचा अभिनेता अशी ही ओळख प्रशांत दामले नाटके परदेशात जायला लागली त्याच्या पाठीमागे सुद्धा यांची कलेच्या क्षेत्रात आहे.
वेगवेगळ्या रियालिटी दामलेचा अभिनय ही किमया सांगता येईल. या प्रवासात शोमध्ये, संगीताच्या कार्यक्रमात, काही नाट्य निर्मिती काय असते, त्याचे भारतात नाटकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आणि परदेशात व्यवस्थापन काय असते म्हणजे नाटक यशस्वी होऊ शकते. याचा स्वतंत्रपणे दामलेंनी अभ्यास केला आपण आहोत. त्या नाटकाची निर्मिती करायला पाहिजे असे काही नाही हे त्यांना या प्रवासात कळले परिणामी तो नसलेल्या कितीतरी नाटकाची निर्मिती ही झालेली आहे. त्यांच्या सानिध्यात राहून नाटकावरची निष्ठा दाखवली की तो त्या कलाकाराला आपलेसे करतो. स्वतः बरोबर सहभागी असलेल्या कलाकारांचा सुद्धा झंझावात दौरा कसा सुरू होईल हे त्यांनी पाहिलेले आहे.
या प्रवासात अनेक कलाकार त्यांच्या सानिध्यात आले आणि ते स्वतंत्रपणे उभे राहिलेले आहेत. आता सध्या निवेदक, कवी, गीतकार, सूत्रसंचालक, अभिनेता, लेखक, सादरकर्ते अशा सर्वच अर्थाने प्रेक्षकांना माहीत असलेला संकर्षण क-हाडे हा सध्या दामलेमय झालेला आहे. दामले यांनी निर्मिती केलेल्या दोन-चार नाटकात त्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. त्याचा सहभाग आहे आणि आता त्याच्या लिखाणात नवे कोरे करकरीत ‘कुटुंब किरतन’ हे नाटक रुजू होत आहे. त्याची निर्मिती प्रशांत दामले यांच्या फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि गौरी थिएटर्सने केली आहे. अमेय दक्षिणदास यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून अशोक पत्की यांचे संगीत, प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभलेली आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा ब्रेकअप ? लग्नाच्या चर्चांदरम्यानच चाहत्यांना मोठा धक्का
वंदना गुप्ते
नाटकात काम करायचे म्हणजे तालमीला वेळ द्या, त्यांच्या ठरलेल्या वेळेत नाटकाचे प्रयोग करा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखादा दौरा आला तर तोही केवळ निर्माता सांगतो म्हणून करा. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बरेच जण नाटकात काम करण्याचे टाळतात. परंतु ज्यांच्या अंतकरणात नाटक भिन्नलेले आहे. जीवनाचे साधन झालेले त्यांनी आयुष्यभर या नाटकाला वेळ दिलेला आहे. त्यामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
आई माणिक वर्मा यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या कलेच्या प्रांतात आल्या. त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी आल्या त्यामुळे नाटक हा त्यांच्या कौटुंबिक विषय झालेला आहे. तो पैशापेक्षा आत्मिक आनंद देण्याचे साधन आहे. हे त्यांनी मानले आहे. प्रेक्षक त्यांना स्वीकारतात म्हणजे गुप्ते यांचे सुद्धा बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गायन, अभिनय, भूमिकेतले विविध पैलू ते सहज आणि उत्स्फूर्त सादर करतात. चारचौघी उगीच त्यांचे कौतुक करत नाहीत. सध्या व्यावसायिक रंगमंचावरी ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक सुरू आहे.
आता लॉटरी लागावी त्या पद्धतीने प्रेक्षकांना आणखीन एक त्यांचे नाटक पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे ‘कुटुंब कीरतन’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकार करणार आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचे नाव संकर्षणचा वाढता प्रेक्षक वर्ग कारण आहेतच परंतु वंदना गुप्ते या नाटकात आहे म्हटल्यानंतर प्रचंड महिलावर्ग त्यांचे हे नाटक पाहण्यासाठी पुढे सरसावणार
आहे हे वेगळे सांगायला नको.
संकर्षण कऱ्हाडे
संकर्षण क-हाडे खरंतर अभिनेता होण्याच्या दृष्टीने मुंबईत दाखल झाला होता. परंतु अभिनयाबरोबर तो उत्तम लेखन करू शकतो, कविता, गीत यांची जाण, बालपणापासून तर ते आतापर्यंत पुस्तकात रमल्यामुळे उस्फुर्त बोलणे, संवाद साधने, प्रेक्षकांची मन जिंकणे है त्याला चांगले जमते त्यामुळे सूत्रसंचालक, निवेदक, संवाद साधक अशाही विविध भूमिकेत तो दिसलेला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि तो कवितेचे कार्यक्रम करतो आहे. त्यांचा हा कवितेचा सिलसिला फक्त महाराष्ट्र, भारतापुरती मर्यादित न राहता जगभरात जिथे जिथे म्हणून मराठी प्रेक्षक आहे. त्यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. थोडक्यात काय तर तो व्यस्त आहे.
एक वेळा दुसऱ्याला वेळ देताना तो दहा वेळा विचार करेल परंतु दामले स्वतः नाटकाची निर्मिती करता आहेत, त्याचे त्यांचे नियोजन, आयोजन हे उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या कलाकाराला प्रेरणा देणारे आहे म्हटल्यानंतर आता संकर्षण हा त्यांचा कुटुंब सदस्य झालेला आहे. ‘कुटुंब कीरतन’ या नाटकासाठी संकर्षणने दुहेरी जबाबदारी सांभाळलेली आहे. तो या नाटकाचा लेखक आहेतच परंतु यात मुख्य भूमिका ही तो साकार करताना दिसणार आहे. जाहिरातीत दिसणारा त्याचा पेहराव प्रेक्षकांना काहीतरी सांगणारा आहे. तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी यांचा सुद्धा या नाटकात कलाकार म्हणून सहभाग असणार आहे.