Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जितेंद्र जोशीने आणलं रितेश देशमुखसाठी खास पत्र, ऐकताच अभिनेता झाला भावुक

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक भावुक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी अभिनेता रितेश देशमुखसाठी एका खास व्यक्तीचं पत्र घेऊन आला.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 10, 2025 | 09:38 PM
जितेंद्र जोशीने आणलं रितेश देशमुखसाठी खास पत्र, ऐकताच अभिनेता झाला भावुक

जितेंद्र जोशीने आणलं रितेश देशमुखसाठी खास पत्र, ऐकताच अभिनेता झाला भावुक

Follow Us
Follow Us:

दिवंगत राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपुत्र म्हणून रितेश देशमुखची ओळख आहे. रितेश देशमुख मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध अभिनेताही आहे. त्याशिवाय तो मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

‘खतरो के खिलाडी १५’साठी रोहित शेट्टीची ‘या’ दोघांना पसंती, एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तर दुसरा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता

गेल्या शनिवारी ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळा झी मराठी चॅनलवर टेलिकास्ट झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक भावुक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी अभिनेता रितेश देशमुखसाठी एका खास व्यक्तीचं पत्र घेऊन आला. ती खास व्यक्ती म्हणजे त्याचे दिवंगत वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं पत्र…

सीमाभागाची पार्श्वभूमी अन् 3 मित्रांची रंजक कथा; एका कट्टर पत्रकाराच्या विचारधारेची कहाणी सांगणाऱ्या ‘फॉलोअर’चा ट्रेलर रिलीज

जितेंद्र जोशीने विलासरावांचं पत्र वाचल्यानंतर रितेश देशमुखला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ ‘राजश्री मराठी’च्या युट्यूब अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

विलासराव देशमुख यांचं पत्र वाचताना व्हिडीओमध्ये जितेंद्र जोशी म्हणतो,

“प्रिय रितेश,” “सप्रेम नमस्कार, विनंती विशेष…” “पत्रास कारण की, या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलासोबत बोलायला केव्हापासून कारणाची गरज भासायला लागली. आमचा दांडगा जनसंपर्क तर तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्यासोबत तुमचा पहिला वहिला मराठी सिनेमा पाहताना खूप भरुन आलं. तुमचा ‘माऊली’ पाहताना तर, अभिमान वाटला होता. तुमचं पहिलं दिग्दर्शन असलेलं ‘वेड’ अनुभवलं आणि खात्री पटली की, तुम्ही यापुढेही अशीच अनुभूती आम्हालाही आणि प्रेक्षकांनाही द्याल. ‘तुझे मेरी कसम’चा आमचा समज तुम्ही ‘वेड’मध्ये खरा ठरवाल, असं आम्हाला वाटलं होतं. पण नाही, तुम्हाला अजूनही सुनबाई पुरुन उरत आहेत. गंमत बाजूला, पण रितेश तुम्ही कितीही वयानं आणि कतृत्वानं कितीही मोठे झालात तरीही आम्हाला दिसतो तो, भावंडांसोबत बाभळगावच्या विहिरीत भोपळे लावून पोहोणारा, गुडघे फुटून सायकलची फेरी मारणारा, मातीमध्ये ढोपरं सोलवटून गोट्यांचा डाव जिंकणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहानगा चिमुरडा… पण, आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत, आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट घेऊन येताय. त्यादिवशी झालेल्या तुमच्या लूकटेस्टला मी तुम्हाला डोळे भरुन पाहिलं. तेव्हा आमचे तुम्हाला पाहून डोळे भरुन आले.” जितेंद्र जोशीने वाचलेलं वडिलांचं पत्र ऐकून रितेशचे डोळे पाणावले. तो भावुक झाला.

कोरियोग्राफर गणेश आचार्चची अभिनयात एन्ट्री, ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटात साकारणार प्रमुख भूमिका

Web Title: Marathi actor riteish deshmukh emotional in zee chitra gaurav 2025 award ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 09:38 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainment Awards
  • Entertainment News
  • Riteish Deshmukh
  • viral video

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Suniel Shetty: सुनील शेट्टींच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कल्चरल आयकॉन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित
2

Suniel Shetty: सुनील शेट्टींच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कल्चरल आयकॉन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
3

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
4

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.