Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकांनी केली घोषणा

१५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 14, 2025 | 03:31 PM
तब्बल १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकांनी केली घोषणा

तब्बल १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकांनी केली घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

‘हुप्पा हुय्या’ म्हटलं की ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून निघते. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा हुय्या २’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

महाकुंभमेळ्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान; म्हणाला “जोवर तो बोलवत नाही तोवर…”

पहिल्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मारुतीरायाने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे आणि हीच आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी दिग्दर्शक समित कक्कड यांचा ‘हुप्पा हुय्या २’ रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने सज्ज होणार आहे. चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले, ‘’हुप्पा हुय्या २’ हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवेल, असा विश्वास मला आहे. आम्ही हा सिक्वेल तितक्याच उत्कटतेने आणि भव्यदिव्य पद्धतीने साकारणार आहोत’.

 

२५ वर्षांपूर्वी हृतिक रोशनने डायरीत नेमकं काय लिहिलं होतं ? जे वाचून वडील राकेश रोशनही झाले होते आश्चर्यचकित…

रानटी, हाफ तिकीट, धारावी बँक, इंदोरी इश्क, आयना का बायना, आश्चर्यचकीत, ३६ गुण या सारख्या वैविध्यपूर्ण चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या समित कक्कड यांच्यासारखा कल्पक आणि सिनेमाच्या तंत्रावर भक्कम पकड असलेला दिग्दर्शक याही चित्रपटाला कलात्मकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेईल यात शंका नाही. समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या २’ ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड हे करीत असून, संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे तर लेखन हृषिकेश कोळी यांचे आहे.

‘संकटात धैर्य, संघर्षात साहस आणि विजयात विनम्रता शिका’ अशी मारुतीरायाची शिकवण मानणाऱ्या ‘हुप्पा हुय्या २’च्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Web Title: Marathi actor siddharth jadhav announcement new marathi movie huppa huiyya 2 sequel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
1

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
2

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक
3

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.