" 'जब वी मेट २' आला तर गीतसाठी तू करेक्ट...", रुपाली भोसले नेमकं कोणाला म्हणाली ?
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याशिवाय मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांच्या अधिराज्य गाजवले आहे. कायमच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर राहिलेली ही मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करुन आहेत. मालिकेमध्ये खलनायिकेचे पात्र म्हणजेच रुपालीचं पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आली आहे.
अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं
रुपाली भोसले कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कायमच चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रुपालीने तिच्या मैत्रिणीसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटामध्ये तिच्या मैत्रिणीने म्हणजेच अभिनेत्री तनिष्का विषेने काम केलं आहे. तिच्या कामाचं कौतुक करणारी पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. दरम्यान, रुपालीने शेअर केलेली ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, रुपाली भोसलेने इन्स्टाग्रामवर तनिष्का विशे आणि सायली संजीवसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं की, “माझ्या कुटुंबात असलेले मित्र… आम्ही ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाच्या प्रीमियरला गेलो होतो, तेव्हाचा हा क्षण… खूप अभिमान आणि खूप कौतुक वाटलं. तनिष्का विषे तू चित्रपटात खूपच गोड दिसली आहे आणि काम सुद्धा खूप छान केलं आहेस. संपूर्ण चित्रपटात तू जो लाइव्लीनेस आणलास आणि तोही कुठेही ओव्हर न करता कमाल कमाल… ‘जब वी मेट’चा पार्ट २ आला तर गीतसाठी तू करेक्ट आहेस, मला इतकी तू आवडलीस. चित्रपट संपल्यावर जेव्हा येऊन तुझं कौतुक करत होते ते बघून खरंच भारी वाटलं. छान, छान कामं करत राहा आणि खूप खूप मोठी हो हिच बाप्पा चरणी प्रार्थना. खूप प्रेम. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो…”
लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपट गेल्या १० एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते या दोन दिग्गज कलाकारांसोबत सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे या लोकप्रिय कलाकारांचीही मजेदार जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.