पुन्हा एकदा स्वप्नील जोशी साकारणार दुहेरी भूमिका; म्हणाला, "चित्रपटात काम करताना तारेवरची कसरत..."
अभिनय आणि निर्मिती विश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा स्वप्नील जोशी कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या स्वप्नीलचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. तो त्याच्या अपकमिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. येत्या काही दिवसांत स्वप्नील जोशीचा ‘सुशीला सुजीत’ मराठी चित्रपट आणि ‘शुभचिंतक’ हा गुजराती चित्रपट रिलीज होणार आहे. या दोन्हीही चित्रपटांची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चर्चांदरम्यान स्वप्नीलने ‘सुशीला सुजीत’ या मराठी चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.
स्वप्नील जोशी स्टारर ‘सुशीला सुजीत’ चित्रपट येत्या १८ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. पोस्टर, टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. स्वप्नील चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असून तो या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. स्वप्नील अभिनेता असून निर्माता म्हणून सुद्धा तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता आणि अभिनेता या दोन्हीही भूमिका साकारणं हे बघायला जेवढं सोप्प दिसतंय तितकं नक्कीच ते सोप्पं नाही. ‘सुशीला सुजीत’ चित्रपटामध्ये या दोन्हीही महत्त्वपूर्ण भूमिका तो साकारणार असताना सगळ्या गोष्टी नीट निभावल्या जातात ना याकडे त्याच लक्ष देखील तितकच होतं. त्याने या दोन्हीही भूमिकांबद्दल भाष्य केलंय.
टॉलिवूड इंडस्ट्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन
स्वप्नीलने ‘सुशीला सुजीत’बद्दल माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “चित्रपटात एकीकडे निर्माता आणि एकीकडे मुख्य अभिनेता म्हणून दुहेरी भूमिका साकारत असताना ही तारेवरची कसरत होती असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटात दोन्हीही भूमिका आव्हानात्मक आणि ताकदीने साकारणं हे माझ्या मित्र मंडळींमुळे शक्य झाले. खरंतर, मला ‘सुशीला सुजीत’ मध्ये माझ्या आवडत्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या निमित्ताने मी आणि आमची संपूर्ण चित्रपटाची टीम आता तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालो आहोत. प्रसाद, मंजिरी, सोनाली आणि अमृता ही सगळीच माझ्या खूप जवळची मित्र मंडळी आहेत आणि या सगळ्यांसोबत हा चित्रपट घडला याचा मला खूपखूप आनंद आहे.”
Idli Kadai: ‘इडली कडाई’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर, धनुषने नवे पोस्टरही केले शेअर!
‘सुशीला सुजीत’ने ट्रेलर लाँच होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला तर आहे, पण चित्रपटाच्या निमित्त स्वप्नीलने पहिल्यांदा सोनाली कुलकर्णी सोबत ऑन स्क्रीन काम केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोहळा आगळ्या वेगळ्या रूपात झाला आणि त्याचं कारण म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर हा कलाकारांच्या हातून न होता चक्क चित्रपटाच्या स्पॉट बॉय कडून करण्यात आला. कलाकारांच्या आयुष्यात किंवा चित्रपटाच्या सेटवर जो माणूस अगदी अहोरात्र काम करतो तो म्हणजे स्पॉट बॉय! हे स्पॉट दादा खरंच कमालीच काम करत असतात आणि म्हणून चित्रपटाच्या ट्रेलर लाँच निमित्ताने त्यांचं कामाचं कौतुक करण्यात आलं. ‘सुशीला सुजीत’ मध्ये स्वप्नील सुजीत ची भूमिका साकारणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी स्वप्नील सज्ज आहे. बेडरूममध्ये अडकलेले ‘सुशीला सुजीत’ आता कसे बाहेर पडणार हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.
‘पुरुषांना आनंदी करण्यासाठी शारीरिक संबंध…’, लैंगिक संबंधाबद्दल नीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य
यंदाच वर्ष हे स्वप्नीलसाठी वैविध्यपूर्ण चित्रपटासाठी खास तर आहे पण तो बहुभाषिक चित्रपटात देखील झळकणार आहे. स्वप्नील ‘शुभचिंतक’ या गुजराती चित्रपटात दिसणार आहे. ‘सुशीला सुजीत’ ही स्वप्नीलच्या आयुष्यातली खास फिल्म तर आहे पण त्याने त्याच्या आवडत्या मित्र मंडळीच्या सोबतीने यात काम केल्याचा आनंद देखील तितकाच आहे.