(फोटो सौजन्य - अकाउंट)
लोकप्रिय अभिनेते रविकुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज शुक्रवार ४ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. अभिनेता कर्करोगाच्या आजाराला ग्रस्त होते. शिवकुमार तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय भूमिकांसाठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, कलाकारांच्या एका संघटनेने त्यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. आता या बातमीने त्याच्या चाहत्यांना चकित केले आहे. आणि आता संपूर्ण टॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अनेक चाहत्यांची आणि कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
Idli Kadai: ‘इडली कडाई’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर, धनुषने नवे पोस्टरही केले शेअर!
सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
नदीगर संगमने सोशल मीडिया पोस्ट शेअर करून शिवकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘मल्याळम आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रविकुमार यांचे चेन्नई येथे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवकुमार यांचे कर्करोगामुळे निधन झाले असल्याचे वृत्त आहे.
शनिवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे
अभिनेत्याचे अंत्यसंस्कार उद्या, शनिवार ०५ एप्रिल रोजी होणार आहे. शिवकुमार यांचे वय सुमारे ७१ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. तमिळमध्ये, रविकुमार यांनी ज्येष्ठ अभिनेते के. बालचंदर दिग्दर्शित ‘अवर्गल’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात लोकप्रिय स्टार रजनीकांत आणि कमल हासन देखील उपस्थित होते.
‘दुप्पट किंमत घ्या…’ अनंत अंबानीने शेकडो कोंबड्यांचा संपूर्ण ट्रकच घेतला विकत, काय आहे कारण?
अभिनेत्याने केले टीव्हीच्या जगातही काम
याशिवाय ‘पागलिल ओरू इरावू’ आणि ‘रमणा’ सारखे चित्रपट देखील आहेत. शिवकुमारच्या मल्याळम चित्रपटांमध्ये ‘अवलुदे रावुकल’, ‘लिसा’, ‘सर्पम’ आणि ‘अंगाडी’ यांचा समावेश आहे. आयुष्याच्या शेवटच्या काळात, अभिनेत्याने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांच्या या बातमीने त्यांचे चाहते देखील चकित झाले आहेत. अभिनेते आता आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट चाहत्यांच्या मनात नेहमीच घर करून राहणार आहे.