Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिकी एकादशीला संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर नवा चित्रपट येणार, कोण असणार प्रमुख भूमिकेत

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील 'आनंदडोह' या नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 12, 2024 | 06:10 PM
कार्तिकी एकादशीला संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर नवा चित्रपट येणार, कोण असणार प्रमुख भूमिकेत

कार्तिकी एकादशीला संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर नवा चित्रपट येणार, कोण असणार प्रमुख भूमिकेत

Follow Us
Close
Follow Us:

संत विचारावर महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. या संतांनी अभंग-श्लोक-ओव्या अशा रचनांतून साहित्याचा अलौकिक ठेवा मराठी भाषेला दिला. अध्यात्म, रुढी-परंपरांकडे पाहण्याची एक निर्मळ दृष्टीही दिली. आजच्या काळात या दृष्टीची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. ‘शिवराज अष्टकाच्या’ रूपाने घराघरांत पोहचलेले गुणी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज अन त्यांच्या शूर शिलेदारांचा इतिहास जागतिक सिनेमांच्या पातळीवर नेऊन ठेवलाय. ‘शिवराज अष्टक’ नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे.

हे देखील वाचा- ‘ऐकावं ते नवंलच…’, ‘कांगूवा’मधील ‘या’ गाण्यात दिशा पाटनीने बदलले २१ वेळा कपडे; स्वत:च केला खुलासा

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ या नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटाचे देखणे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘साईराम एंटरप्राईजेस’ निर्मित, योगेश सोमण लिखित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘आनंदडोह’ हा भव्य मराठी चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षक भेटीला येणार आहे. अविनाश शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुक्ता बर्वे, योगेश सोमण, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे असे मराठीतले नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंगगाथा हा मराठी साहित्यातील फार अनमोल ठेवा आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेशी झगडताना त्यांनी बहुजन समाजाला ज्ञानमार्ग दाखवतील असे अनेक अभंग रचले. त्यांच्या ३००० हून अधिक अभंगातून आजही आपल्याला जगण्याची प्रेरणा व मार्गदर्शन मिळते. यातले अनेक अभंग म्हणींच्या स्वरूपात सुद्धा अलंकृत झालेले पहायला मिळतात. या अभंगगाथेतल्या तत्वज्ञानाला तत्कालीन रूढीवादी पंडितांनी विरोध केला.

 

संत तुकाराम महाराजांची ही गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडविण्यात आली. संत तुकारामांच्या भक्तीचा चमत्कार म्हणून हे अभंग इंद्रायणीतून तरले, असे सांगण्यात येते. हीच अद्वित्तीय अभंगगाथा इंद्रायणी डोहात बुडल्यापासून ते तरल्या पर्यंतच्या तेरा दिवसात जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, त्यांची पत्नी आवली, त्यांचे कुटुंब,संपूर्ण तत्कालीन समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक या सगळ्यांवर काय परिणाम झाला याची कथा ‘आनंदडोह’ चित्रपटात असणार आहे.

आजच्या परिस्थितीत संत साहित्याच्या समृद्ध संचिताविषयी कृतज्ञतेचा भाव मनात असून हे संचित आपल्याला पुन्हा एकदा जगण्याचे बळ देणारे असेल या विश्वासाने आम्ही संत परंपरेतील चित्रपटांच्या निर्मितीचा संकल्प लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोडला आहे.

हे देखील वाचा- रुपाली गांगुलीने मानहानीचा खटला दाखल करताच ईशा वर्माने केले हे कृत्य, जाणून व्हाल चकित!

Web Title: Marathi movie ananddoh director digpal lanjekar announced new movie on kartiki ekadashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 06:10 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • Sant Dnyaneshwar Maharaj

संबंधित बातम्या

Param Sundari : सिद्धार्थ मल्होत्रा ​​की जान्हवी कपूर, परम सुंदरीसाठी सर्वाधिक मानधन कोणाला मिळालं?
1

Param Sundari : सिद्धार्थ मल्होत्रा ​​की जान्हवी कपूर, परम सुंदरीसाठी सर्वाधिक मानधन कोणाला मिळालं?

Bigg Boss 19 Promo : प्रणित मोरेला सलमान खानने दाखवला आरसा! भाईजानच्या करिअरवर केलेले जोक पडले महागात
2

Bigg Boss 19 Promo : प्रणित मोरेला सलमान खानने दाखवला आरसा! भाईजानच्या करिअरवर केलेले जोक पडले महागात

ईशा देओलचा Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात, ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; कौटुंबिक कार्यक्रमात दिसली झलक
3

ईशा देओलचा Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात, ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; कौटुंबिक कार्यक्रमात दिसली झलक

लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणार तान्या मित्तल, हे ऐकून मृदुल म्हणाला ‘आता मला तुझ्याशीच करायचे’
4

लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणार तान्या मित्तल, हे ऐकून मृदुल म्हणाला ‘आता मला तुझ्याशीच करायचे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.