Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा श्रीगणेशा! हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये दिसणार पहिल्यांदाच एकत्र

‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली असून या चित्रपटाच्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2025 | 03:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. आता या चित्रपटाच्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला असून, या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक नवी आणि हटके जोडी झळकणार आहे ती म्हणजे हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्येची! या दोघांची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेमकी कशी असणार, हे पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. हृता तिच्या गोड आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखली जाते, तर सारंगने नेहमीच वेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांवर ठसा उमटवला आहे. त्यामुळे ‘आली मोठी शहाणी’त दोघांची जोडी नेमकी कोणत्या कथानकातून झळकणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “ नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली असून प्रेक्षकांसाठी एक वेगळं आणि मनोरंजक कथानक घेऊन आम्ही येत आहोत. हृता आणि सारंगची जोडी नक्कीच सर्वांना आवडेल, याची मला खात्री आहे. संपूर्ण टीम या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.”

Bigg Boss 19: गौरवच्या मेहनतीवर फेरले पाणी, अमाल मलिक बनला नवा कॅप्टन; घरातील स्पर्धकांमध्ये झाला वाद

चित्रपटाचं शीर्षक ‘आली मोठी शहाणी’ जितकं आकर्षक, तितकंच ते कथानकाबद्दल कुतूहल निर्माण करणारं आहे. आता या हटके शीर्षकाखाली नेमकं काय घडणार आणि हृता-सारंगची जोडी प्रेक्षकांच्या मनात किती शहाणी ठरणार, हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे! दरम्यान, या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केलं आहे. ‘फाईन ब्रू प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत आणि ‘ट्रू होप फिल्म वर्क्स’च्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते जयकुमार मुनोत, ईशा मूठे आणि श्रुती साठे आहेत.

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटातून उलगडणार सासू-सुनेच्या नात्याची नवी गोष्ट

सारंग साठ्ये हे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि डिजिटल माध्यमातील एक बहुमुखी कलाकार आहेत. पुण्यात जन्मलेला आणि वाढलेला सारंगने शिक्षण घेत असतानाच नाटक, एकांकिका आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली आणि नंतर चित्रपट तसेच डिजिटल माध्यमात प्रवेश केला. मराठी प्रेक्षकांमध्ये त्याची खरी ओळख झाली ती ‘भारतीय डिजिटल पार्टी’ (BhaDiPa) या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलमुळे. या माध्यमातून त्याने मराठी भाषेत विनोदी आणि सामाजिक भान जपणारे कंटेंट निर्माण करून तरुण पिढीला मराठी मनोरंजनाशी पुन्हा जोडले.

Web Title: Aali mothi shahani begin shooting in goa hruta durgule sarang satheshare screen for the first time in movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Daya Dongre Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टीने गमावला एक बहुमुखी कलाकार
1

Daya Dongre Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन, मराठी चित्रपटसृष्टीने गमावला एक बहुमुखी कलाकार

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!
2

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!

Tejaswini Lonariचा पारंपरिक अंदाज! आईच्या आवडीचे दागिने आणि मराठमोळा साज ठरला चर्चेचा विषय, साखरपुड्याचा लूक पाहा
3

Tejaswini Lonariचा पारंपरिक अंदाज! आईच्या आवडीचे दागिने आणि मराठमोळा साज ठरला चर्चेचा विषय, साखरपुड्याचा लूक पाहा

बस्स इतकंच! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं बजेट कोटींमध्ये आणि कमाई फक्त…
4

बस्स इतकंच! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचं बजेट कोटींमध्ये आणि कमाई फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.