Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृता – सोनाली पहिल्यांदाच दिसणार एकत्र, ‘परिणती- बदल स्वतःसाठी’ मध्ये दिसणार दोन स्त्रियांची अनोखी कहाणी

सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष या दोन अभिनेत्रीची पहिल्यांदाच केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 'परिणती- बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट एका नव्या कथेसोबत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 15, 2025 | 08:00 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत आजवर उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे. या चित्रपटामध्ये दोन स्त्रियांच्या अनोख्या कथा उलगडणार आहेत.

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज

या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत असून, एक सोनाली आहे तर दुसरी अमृता. सोनाली रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास, एक वेगळा आकर्षक बाणेदारपणासोबत दिसत आहे, तर दुसरी म्हणजे अमृता साधेपणात गुंतलेली, सोनालीच्या कुशीत विसावलेली दिसत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या कथेची झलक देत आहे. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणं वेगळी आहेत, परंतु दोघींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे स्वतःसाठी बदल घडवणे. या पोस्टरमधील दोघींचा लूक पाहून चित्रपटाची कथा नक्की काय असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणाले की, ‘परिणती’ या चित्रपटात मी अशा दोन स्त्रियांना एकत्र आणलं आहे, ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते. सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. ‘परिणती’ ही त्यांच्या वाटचालीची, बंडाची, आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे. ‘परिणती’ प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही, तर विचारही करण्यास भाग पाडेल.’ असे त्यांनी म्हटले आहे.

निधनानंतर Saroja Devi यांची इच्छा झाली पूर्ण, पाच वर्षांपूर्वी ‘ही’ अनोखी इच्छा केली होती व्यक्त

‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे. दरम्यान, अमृताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, नुकताच प्रदर्शित झालेला ‘जारण’ चित्रपटामध्ये ती दिसली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या सिनेमातल्या अभिनयासाठी अभिनेत्रीच भरभरून कौतुकही झाले आहे. तर या सिनेमातल्या एका गाण्यात सोनाली कुलकर्णीही दिसली होती. सोनालीच्या चाहत्यांसाठी मात्र तिला बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता पूर्ण होणार आहे.

Web Title: Amruta subhash and sonalee kulkarni parinati movie poster first look viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • sonalee kulkarni

संबंधित बातम्या

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
1

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट  घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद
2

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती
3

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘
4

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.