Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Pach Futacha Bachchan Movie: श्रुती मधुदीप अभिनीत ‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाचा ट्रेलर रितेश देशमुखांच्या उपस्थितीत लाँच झाला. कीर्तनकार तरुणीची कथा असलेला हा चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pach Futacha Bachchan Movie: नाटक, शॉर्टफिल्म्स आणि कथकच्या माध्यमातून अभिनयाची वाटचाल करणारी युवा अभिनेत्री श्रुती मधुदीप आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रुतीची प्रमुख भूमिका असलेला ‘पाच फुटाचा बच्चन’ हा मराठी चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात लाँच करण्यात आला. याआधी प्रदर्शित झालेल्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादानंतर ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

कीर्तनकार तरुणीची अनोखी गोष्ट

‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये एका तरुण कीर्तनकार मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. तिच्या कीर्तनात कोल्हापुरी भाषेचा बाज आहे. संतांचे अभंग तिला मुखोद्गत असून, आपल्या खास शैलीमुळे तिची जनमानसात मोठी ओळख निर्माण झाली आहे. उंचीने अवघी पाच फूट असलेली ही तडफदार तरुणी ‘पाच फुटाचा बच्चन’ म्हणून ओळखली जाते. या भूमिकेतून श्रुती मधुदीप मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, मूळ प्रायोगिक एकपात्री नाटकातही श्रुतीनेच ही भूमिका साकारली होती.

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये नाट्यमय झलक

चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर सुमारे अडीच मिनिटांचा असून, त्यात कीर्तन, मनोरंजन आणि नाट्यमय प्रसंगांची झलक पाहायला मिळते. चित्रपटात नेमकं काय घडणार, या प्रश्नाचं कुतूहल ट्रेलर आणखी वाढवतो. दमदार कलाकारांची फौज आणि वेगळ्या विषयाची मांडणी यामुळे ‘पाच फुटाचा बच्चन’कडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

रितेश देशमुख म्हणाले, ‘बच्चनच्या बाजूला उभं राहणं…’

ट्रेलर लाँच सोहळ्यात रितेश देशमुख यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “बच्चनच्या बाजूला उभे राहणं, मग ते सहा फुटाचा असो किंवा पाच फुटाचा, मलाही थोडी धाकधूक होती.”

पुढे चित्रपटाच्या आशयाबद्दल बोलताना रितेश देशमुख यांनी सांगितलं की, महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारा हा चित्रपट आहे, हे ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवतं. पहिला चित्रपट करताना तो कसा तयार होतोय याची पूर्ण कल्पना नसते; मात्र प्रेक्षकांची साथ महत्त्वाची असते आणि ती या टीमला मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

एकपात्री नाटकातून मोठ्या पडद्यावर

‘पाच फुटाचा बच्चन’ या कथेची सुरुवात मूळ प्रायोगिक एकपात्री नाटकातून झाली होती. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच कथेचं चित्रपटात रूपांतर करण्यात आलं आहे. नाटकातून चित्रपटात रूपांतर होणाऱ्या कलाकृतींच्या यादीत या चित्रपटाचीही भर पडली आहे.

‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये कलाकारांची मोठी फौज

कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात श्रुती मधुदीप, गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमीत, क्षितीश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचं छायांकन अभिषेक शेटे यांनी, संकलन सौरभ प्रभुदेसाई यांनी, संगीत निरंजन पेडगावकर यांनी तर गीतलेखन प्रदीप आवटे यांनी केलं आहे.

९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार

टीझरनंतर आता ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची आणि व्यक्तिरेखांची आणखी झलक समोर आली आहे. कीर्तनाच्या पार्श्वभूमीवरची कथा, मनोरंजनासोबत विचार करायला लावणारी मांडणी आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ‘पाच फुटाचा बच्चन’बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pach futacha bachchan movie trailer shruti madhudeep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
1

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.