Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा मजेशीर मोशन पोस्टर रिलीज; ग्रामीण गप्पा आणि रहस्याचा अनोखा संगम

निर्मिती सावंत, भार्गवी चिरमुले आणि शशांक शेंडे यांच्या भूमिका असलेला आगामी मराठी चित्रपट ‘भागूबाई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आहे. या चित्रपटाचा धमाकेदार पोस्टर रिलीज झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 08, 2026 | 03:02 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘भागूबाई’चा मजेशीर मोशन पोस्टर रिलीज
  • ग्रामीण गप्पा आणि रहस्याचा अनोखा संगम
  • निर्मिती सावंत यांची अनोखी भूमिका
 

ग्रामीण महाराष्ट्रातील गप्पा, अफवा आणि छोट्या-मोठ्या चर्चांच्या रंगतदार दुनियेला हलक्या-फुलक्या विनोदी शैलीत उलगडणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून, २४ एप्रिल २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. पोस्टर पाहताच चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

मोशन पोस्टरमध्ये ‘भागूबाई’चा खोडकर आणि गमतीशीर अंदाज पाहायला मिळतो. ओठांवर बोट ठेवत ‘श्श…’ असा इशारा करणारी तिची शैली आणि तिच्यामुळे गावात पडलेली फूट याचे संकेत पोस्टरमधूनच मिळतात. यामुळे हा चित्रपट केवळ विनोदी नसून त्यात काहीतरी रहस्य आणि नाट्यमय वळणही दडलेलं असल्याचं स्पष्ट पाहायला मिळणार आहे.

चक्क चक्कीत दळला मृतदेह! तुंरुगात झालेला खून अन् त्या मागचा थरार; ‘या’ सिनेमामुळे Netflix चर्चेत

काय आहे चित्रपटाची कथा?

‘भागूबाई’ ही कथा आहे एका अशा बाईची, जिला गावातील गप्पा, कुचाळक्या आणि अफवांमध्ये विशेष रस असतो. तिच्या या स्वभावामुळे गावात अनेक घटना घडत राहतात. मात्र तिच्या आयुष्यात अचानक घडणारी एक अनपेक्षित घटना सगळंच चित्र बदलून टाकते आणि कथा एका वेगळ्याच दिशेने पुढे जाते. अशातच आता ही चित्रपटाची कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात निर्मिती सावंत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर, नागेश भोसले आणि निखिल चव्हाण यांसारखे दमदार कलाकार देखील दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाला अधिक रंगत येणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती श्रद्धा पटेल यांनी केली असून दिग्दर्शन संजय अमर यांनी केली आहे. दिग्दर्शक संजय अमर यांच्या मते, ‘भागूबाई’ हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रातील साध्या माणसांच्या आयुष्याचं वास्तव आणि त्यांच्या भावनांचं मनापासून केलेलं चित्रण आहे. आजच्या वेगवान डिजिटल युगातही हा चित्रपट प्रेक्षकांना अस्सल आणि निरागस आयुष्याची जाणीव करून देणार आहे.

प्रिन्स नरूलावर गाणं चोरल्याचा आरोप; ‘Ruffle Dunali’ ऑडिओ लीक करत आर्टिस्टचा मोठा खुलासा

निर्माती श्रद्धा पटेल यांनीही या चित्रपटाबद्दल सांगताना म्हंटले की, ‘भागूबाई’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून तो प्रेक्षकांना जोडून ठेवणारा आणि एक अर्थपूर्ण संदेश देणारा आहे. वेगळा विषय आणि दमदार कलाकार यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा त्यांना विश्वास आहे. हास्य, नातेसंबंध आणि दडलेलं सत्य यांचा सुंदर मिलाफ असलेला ‘भागूबाई’ हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच, मजेदार आणि विचार करायला लावणारा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच अंतर्मुखही करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bhagubai marathi movie motion poster release cast story release date 24 april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
1

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट
2

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
3

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज
4

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.