Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधीच सीट बुक करा! रितेशच्या ‘राजा शिवाजी’चा दमदार टीझर ‘या’ चित्रपटासोबत थिएटरमध्ये पाहता येणार

‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता चित्रपटगृहांमध्येच पाहता येणार आहे. हा टीझर लवकरच मोठ्या पडद्यावर ‘धुरंधर – द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत सादर केला जाणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 18, 2026 | 07:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रेक्षकांसाठी खास आनंदाची बातमी! जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत ‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता चित्रपटगृहांमध्येच पाहता येणार आहे. हा टीझर लवकरच मोठ्या पडद्यावर ‘धुरंधर – द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत सादर केला जाणार आहे. उत्साही प्रेक्षकांनी आपली सीट आधीच बुक करून ठेवण्याची सूचना दिली जात आहे, जेणेकरून ऐतिहासिक स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक मोठ्या पडद्यावर अनुभवता येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रितेश विलासराव देशमुखच्या प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांना हा ऐतिहासिक प्रवास अनुभवायला मिळणार असून, दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या चित्रपटात भारतातील महान योद्धा आणि त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष सादर केला जात आहे. या अनुभवाची पहिली झलक प्रेक्षकांना फर्स्ट लूक टीझर माध्यमातून मिळणार आहे.

या भव्य ऐतिहासिक कलाकृतीसाठी संगीताची जादू अजय-अतुल यांनी तयार केली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी अप्रतिम छायाचित्रणातून गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलिक सीमांचा भेद न करता भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे चित्रपट निर्मात्यांचे उद्दिष्ट आहे.

Nora Fatehi आणखी अडचणीत! ‘अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या..’ म्हणत कंगना रणौतचा बॉलीवूडवर हल्लाबोल

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास भव्य आदरांजली अर्पण करणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.

या चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी अजय-अतुल या लोकप्रिय जोडीवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या भव्य आणि प्रेरणादायी संगीतामुळे चित्रपटाला अधिक ऐतिहासिक आणि भावनिक उंची मिळण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ मराठी भाषेत मर्यादित न राहता इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतून एक भव्य पॅन इंडिया प्रकल्प साकारत असल्याचा अभिमान व्यक्त केला जात आहे.

तसेच, या चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त, जिनिलिया देशमुख यांच्यासह इतर मोठे कलाकार झळकणार आहेत. आणि त्यांच्या खास भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भव्य निर्मितीमूल्ये आणि दमदार कलाकारांमुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

चारधाम यात्रेसाठी Sara Ali Khan ला द्यावा लागणार अ‍ॅफिडेविट? ‘मी सनातनी आहे’ लिहिण्याची मागणी; मंदिर समितीच्या वक्तव्याने वाद!

Web Title: Book your seats now ritesh raja shivaji power packed teaser to be seen in theaters alongside dhurandha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • marathi movie
  • ranvir singh
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

समर्थ रामदासांच्या विचारांचा जागर, ‘समर्थ’चा फर्स्ट लुक चर्चेत; अडीच हजार विद्यार्थ्यांसमोर पोस्टरचे भव्य अनावरण
1

समर्थ रामदासांच्या विचारांचा जागर, ‘समर्थ’चा फर्स्ट लुक चर्चेत; अडीच हजार विद्यार्थ्यांसमोर पोस्टरचे भव्य अनावरण

Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘राजा शिवाजी’ आता OTTवर, रिलीज डेट आली समोर, कधी आणि कुठे पाहाल? वाचा…
2

Raja Shivaji OTT Release: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘राजा शिवाजी’ आता OTTवर, रिलीज डेट आली समोर, कधी आणि कुठे पाहाल? वाचा…

‘मी याचं उत्तर देणार नाही’, Salman Khan -संजय दत्तबद्दल प्रश्न ऐकताच का संतापला Riteish Deshmukh? व्हिडिओ व्हायरल
3

‘मी याचं उत्तर देणार नाही’, Salman Khan -संजय दत्तबद्दल प्रश्न ऐकताच का संतापला Riteish Deshmukh? व्हिडिओ व्हायरल

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू
4

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.