(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टीत मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही निर्मात्यांनी मानधन थकवल्याची तक्रार केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली होती. आता अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. शशांकची पोस्ट पाहून अनेक कलाकारांनी मानधन थकवणाऱ्या निर्मात्यांविरोधात आवाज उठवला सुरूवात केली आहे. ”पाच वर्ष झाली.. पैसे मिळाले नाहीयेत, आता कुंडली सकट सविस्तर व्हिडिओ शेअर करेन” अशी पोस्ट शशांकने केली होती.
आता लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळेने सुद्धा यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सविस्तर मुद्दे मांडले असून इंडस्ट्रीमधील विदारक सत्य सर्वांसमोर मांडलं आहे. सगळ्या कलाकारांनी मिळून या अशा निर्मात्यांना BLACKLIST केलं पाहिजे. अशी पोस्ट आस्तादने केली आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया….
अभिनेता अस्ताद काळेची पोस्ट
आपण एकत्र येणार???? एक होणार????
मराठी दूरचित्रवाणीच्या (Television) क्षेत्रात एक रूढ परंपरा आहे. कदाचित हिंदीतही असेल, पण ते मला माहिती नाही. मी तिथे काम केलेलं नाही.तर परंपरा अशी, की काही निर्माते एकत्र येऊन एखाद्या कलाकाराला BLACKLIST करतात. त्याला/तिला काम मिळू द्यायचं नाही हे आपापसात मिळून ठरवतात.
कधीकधी, नव्हे बऱ्याचदा त्या कलाकाराचा यात दोष असतो. बेशिस्त वागणं, अवाजवी मागण्या करणं वगैरे पैलू त्यात कारणीभूत ठरतात. (मी “त्या” यादीत येता येता राहिलोय..वाचलोय..माझ्याच चुकांमुळे, आणि त्या वेळीच सुधारल्यामुळे.) त्यामुळे मला हे नक्की माहिती आहे. पण काही सद्भावी, सहृदयी, प्रामाणिक आणि शिवाय प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांना केलेल्या कामाचे पैसेच देत नाहीत निर्माते!!!! मग फार प्रसिद्धी न मिळालेल्या कलाकारांची या बाबतीतली व्यथा तर बोलायलाच नको….नको?????बोलायलाच हवी….काही राजकीय पक्षांच्या संघटना आहेत, ज्या कलाकारांच्या प्रश्नांसाठी काम करतात. पण निर्मात्याची जर त्या पक्षात किंवा एकूणच राजकीय वर्तुळात खूप ओळख आणि उठ-बस असेल तर??? तर पुन्हा हात बांधले जातात आणि तोंड बंद होतं.(हाही अनुभव मला स्वत:ला आलेला आहे)
एखादी मालिका फार चालली नाही, तर निर्मात्याचं नुकसान होतं. तेव्हा कलाकारांनी त्या नुकसानातला वाटा उचलणं अपेक्षित असतं. राहिलेल्या मानधनातले ५०% कमी करून देण्याच्या offers मला स्वत:ला आलेल्या आहेत. पण….जर मालिका चालली, फायदा झाला, तर त्याचा वाटा मात्र कलाकरांच्या नशिबी येत नाही. हे आणि हेच विदारक सत्य आहे. कलाकारांनी एकत्र येणं गरजेचं आहे.
निर्मात्यांचं जसं एक GUILD आहे तसं तयार करणं गरजेचं आहे. काही निर्मात्यांना कलाकारांनी एकत्र येऊन BLACKLIST करणं गरजेचं आहे. Channels कडून या काही निर्मात्यांना डावललं जाणं गरजेचं आहे. हातांच्या बोटांवर मोजता येतील इतके विश्वासार्ह निर्माते आहेत आज मराठी Television मध्ये. बाकी अनेक आहेत बुडवे. पण तरी त्यांना Channelsकडून Projects मिळत राहतात. म्हणून कलाकारांनी एकत्र येणं, आपलं एक स्वतंत्र GUILD उभं करणं गरजेचं आहे.
ता.क:-१) कलाकारांमधे फक्त नट/नट्या धरत नाहीये मी. तांत्रिक बाजू न सांभाळणारे हे सगळे कलाकार आहेत. तंत्रज्ञ वेगळे, कलाकार वेगळे.
२) Channels नी कृपया “या आधीच्या Project मध्ये काम केलेल्या सर्वांचे NOC दाखवल्याशिवाय पुढचं Project देणार नाही” असं काहीसं धोरण तरी अवलंबावं. जे CENSOR CERTIFICATE साठी करावं लागतं तसं.

(आस्ताद काळेची पोस्ट)
वाढदिवसाच्या दिवशी Deepika Padukone ने चाहत्यांना दिले सरप्राईज, नव्या पिढीसाठी उचललं मोठं पाऊल
मानधन थकवणाऱ्यावर सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे अस या कलाकारांचे म्हणणं आहे. या आधी अनेक कलाकरांनी मानधन न मिळाल्याची तक्रार सोशल मीडियावर पोस्ट करत केली होती.






