झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विठ्लाच्या भक्तीचा छंद आणि जोडीला गोड गळा म्हणजे सावली अशी ओळख घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राप्ती रेडकर. खूप कमी वेळात प्राप्तीने प्रेक्षकांची पसंती मिळवली. मालिकेतील इतर कलाकारांना देखील कमी वयात लोकप्रियता मिळाली. याचबाबत प्राप्तीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
मुलाखतीत प्राप्तीला तिच्या भूमिकेविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होती. प्राप्ती म्हणाली की, सावली आणि मी खूप वेगळ्या आहोत. सावली गरिब कुटुंबातील लाजरी शांत आणि सोज्वळ अशी मुलगी आहे. जिच्या गोड गळ्याने संपूर्ण गावच मंत्रमुग्ध होत नाही तर तिच्या विठ्ठल भक्तीची किर्ती देखील मोठी आहे. कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे भैरवीने सावलीला असहाय्यतेचा अनेकादा फायदा घेत आपल्या मुलीला म्हणजेच ताराला गायिका म्हणून जगासमोर आणलं. सावली अत्यंत सोशिक अशी मुलगी मुलगी आहे. असं प्राप्तीने झी मराठी सोहळ्याच्या निमित्ताने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.
या सोहळ्यानिमित्ताने प्राप्ती रेडकरने सावलीसारखाच लुक केला होता. पारंपरिक साडी, डोळ्यांवर चष्मा आणि हातात विठ्ठलाची मूर्ती. झी मराठी अॅवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ठ नायिका आणि सर्वोत्कृठ जोडी अनेक दोन नामांकन प्राप्तीला मिळाले आहेत. याचनिमित्ताने तिने व्हायफळ गप्पा या पॉडकास्टला हजेरी लावली होती.
या पॉडकास्टमध्ये प्राप्ती म्हणाली की, एखादी भूमिका तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात खूप काही देऊन जाते. सावलीची भूमिका माझ्यासाठी तशीच आहे. सावली अत्यंत संयमी आणि शांत मुलगी आहे. याउलट प्राप्ती आहे. किकबॉक्सर असल्याने मी बिनधास् बेधडक आहे. सावलीच्या भूमिकेने काय दिलं तर मला संयम शिकवला. विठुरायाची ओळखच मला सावलीमुळे झाली. मी मुळची कोकणातली त्यामुळे कोकणात जास्त गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे विठुरायाशी कधी संबंध आला नाही ते सावलीमुळे आला. सावली या भूमिकेने वैयक्तिक आयुष्यात मला शांत आणि स्थिर जगायला शिकवलं आहे, असं प्राप्ती म्हणाली.
सध्या मालिका विश्वात चर्चा सुरु आहे ते झी मराठी अॅवॉर्ड 2025 ची. कोणत्या मालिकेला सर्वात जास्त पुरस्कार मिळणार आहेत याबाबत प्रेक्षकांच्या मनात देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.