(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्या ‘साबर बोंडं’ या चित्रपटाने सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँण्ड ज्युरी प्राईज हा सर्वोच्च सन्मान पटकावून इतिहास रचला आहे. हा पुरस्कार मिळणारा ‘साबर बोंडं’ हा पहिला भारतीय कथाभाष्यपट (फिक्शन) चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवाणे यांसारख्या नामांकित कार्यकारी निर्मात्यांची भक्कम साथ मिळाली आहे. तसेच हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नवराष्ट्रशी दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी वेळात वेळ काढून गप्पा मारल्या आहेत आणि त्याच्या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास सांगितला आहे.
सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने इतिहास रचला आहे या बद्दल काय सांगाल?
उत्तर : सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘साबर बोंडं’ चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले. आणि या सगळ्या पुरस्कारमुळे चित्रपटाला एक वेगळी ओळख मिळत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. ‘साबर बोंडं’ चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. आणि आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा सिनेगृहात जाणून अनुभवता येणार आहे. एका दिग्दर्शकाचं नेहमीच एक स्वप्न असतं की आपला चित्रपट चित्रपटगृहाद्वारे प्रेक्षकांनी पाहावा आणि त्याला भरभरून प्रेम द्यावे. आणि हे स्वप्न अखेर पूर्ण होतं आहे याचा मला खूप आनंद झाला आहे.
‘साबर बोंडं’ हा तुमचा पहिला चित्रपट आहे तर हा चित्रपट करताना काय अनुभव होता?
उत्तर : माझ्या घरात कोणाला दिग्दर्शनाची आवड नाही आहे, तसेच ना ही मी दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. आणि हे सगळं असूनही मला चित्रपट करण्याची मनात इच्छा निर्माण झाली. हा चित्रपट करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. आम्ही या चित्रपटावर ५ वर्ष काम केलं आहे. आणि आता २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. चित्रपटाचे काम सुरु करण्याआधी मला आधी खूप नकार मिळाले, आणि असे असताना मला अनेक वेळा प्रश्न पडला की असं असताना पुढे जाईल का हा चित्रपट? कथा आवडेल का प्रेक्षकांना? परंतु चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. आणि पुढील यशाचा मार्ग सोपा केला.
हा चित्रपट मैत्री आणि प्रेमावर भाष्य करणारा आहे तर या चित्रपटाची कल्पना तुम्हाला कशी सुचली?
उत्तर : माझा जन्म मुंबईचा आहे मी लहानाचा मोठा मुंबईमध्येच झालो. लहान असतानाही मी अनेकवेळा गावी गेलो आहे. पण १० नंतर मी गावी गेलो नाही आणि एकदा अचानक माझ्या वडिलांचे अकाली निधन झाले. आणि तेव्हा मी आईसोबत गावी गेलो होती. आणि मला आठवतंय मी २३ वर्षांचा होतो तेव्हा मला गावातील माणसं नेहमी माझ्या लग्नाबद्दल विचारात असे, माझ्या आईला देखील माझ्या लग्नाची विचारपूस करत असे. आणि त्यानंतर मी गावी जाणं टाळायला लागतो. मी त्यानंतर गावी कधी जास्त गेलोच नाही. मला माझ्या घरातील कुटुंबाला आणि नातेवाईकांना माझ्या सेक्शुअलिटी बद्दल सांगायचे नव्हते, कारण ते असे रिॲक्ट करतील याची मला कल्पना नव्हता. पंरतु लग्न का करत नाही आहेस? या प्रश्नाचं माझ्यावर इतकं प्रेशर झालं की मला असं वाटू लागलं की जर माझा या गावामध्ये कोणता मित्र असता आणि त्याला याबद्दल सगळी कल्पना असती तर काय झालं असतं? असे विचार माझ्या डोक्यात येऊ लागले आणि या चित्रपटाची कथा तयार झाली.
साबर बोंड म्हणजे नक्की काय? सामान्यांसाठी आणि Gen Z साठी हा शब्द तसा नवा आहे
उत्तर : माझं असं सांगणं आहे या चित्रपटाचं नाव साबर बोंड असं का आहे हे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाणून हा चित्रपट पाहून जाणून घेतलं पाहिजे. कारण जेव्हा हा चित्रपट प्रेक्षक समोरून अनुभवातील तेव्हा त्या नात्यांची गोष्ट आणि चित्रपटाची कथा त्यांना समजेल आणि या चित्रपटाचे नाव असे का आहे हे समजेल. तरीही सांगायचं झालं साबर बोंड हे एक फळाचं नाव आहे. आणि या फळांचे खूप फायदे देखील आहे. तरं प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना समजेल की चित्रपटामधील पात्र देखील तसेच आहे. तसेच या चित्रपटामध्ये मुख्य दोन पात्र आहेत त्यांना खूप कठीण परिस्थितून जावं लागत आणि यानंतर ते खऱ्या नात्याला सुरुवात होते. त्यांचं मैत्रीचं नातं आणखी घट्ट होत जात.
नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवाणे अशी मोठी नावं समोर येत आहेत, तर त्यांची साथ कशी मिळाली?
उत्तर : चित्रपट तयार होत असताना सईला आणि नागराज सरांना माहित होतं की चित्रपट बनत आहे. आणि माझी खूप इच्छा होती या चित्रपटाला चांगल्या मोठ्या कलाकारांनी साथ मिळावी. आणि ते शक्य झालं, आणि चित्रपट तयार होण्यासाठी आणखी हातभार लागला. ‘साबर बोंडं’ चित्रपट आणखी चांगला तयार झाला.
गाणं कडकडीत.. प्रेम झणझणीत…!‘वडापाव’ चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज
रोहनच्या स्वतःच्या आयुष्यातील काही अनुभवांचा या चित्रपटासाठी उपयोग झाला का?
उत्तर : खरं सांगायचं तर या चित्रपटाची कथा ही १०% माझ्या आयुष्याशी संबंधित आहे. आणि बाकी चित्रपटाची संपूर्ण कथा ही माझ्या कल्पनेमुळे सुचली आहे. तसेच चित्रपटामध्ये मी सगळे बद्दल घडून आणले आहेत, सगळ्याच गोष्टी या माझ्या आयुष्यातील परफेक्ट कथा नाही आहे. खूप विचार करून आणि खूप भावनेने ही गोष्ट मी तयार केली आहे. तसेच चित्रपटामध्ये प्रेम कथा दाखवण्यात आली आहे ती माझी कल्पना आहे करत माझ्या खऱ्या आयुष्यात असं कधी झालं नव्हतं. चित्रपटाची संपूर्ण कथा ही प्रेरणादायी आहे.
पुढचा प्रोजेक्ट काय असेल?
उत्तर : माझी नावापासून इच्छा आहे की भारतीय लोकांनी माझ्या याच पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळावा. या चित्रपटाला त्यांचे भरभरून प्रेम मिळावे. माझ्यासाठी ही नुकतीच सुरुवात आहे, आता हे नवीन प्रोजेक्ट येतील ते मला वाटेल की आपण हे करायला हवं तेव्हा मी नक्कीच घेऊन येईल. पण तो पर्येंत मला अजून खूप काही पुढे शिकायचं आहे, खूप काही काम करायचं बाकी आहे. आता सध्याला मला एवढाच वाटतं की आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतोय त्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम द्यावे.