Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाणं कडकडीत.. प्रेम झणझणीत…!‘वडापाव’ चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज

'वडापाव' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनाला आणखी तडका देण्यासाठी सज्ज आहे. गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी घेऊन अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच या चित्रपटाचं टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2025 | 04:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • वडापाव’ चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज
  • चित्रपटात दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

वडापाव म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेला पाणी सुटतं. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदार आणि घट्ट बनतात. अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. आणि आता या चित्रपटाचे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे गाणं नक्कीच आजच्या पिढीला आवडेल असं आहे. आणि नक्कीच हा टायटल ट्रॅक सोशल मीडियावर हवा करेल.

“प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!”, या भन्नाट ओळींसह ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत आहे. मुंबईचा जीव असलेला वडापाव जसा सर्वांचा लाडका आणि आवडता आहे, तसेच हे गाणंही प्रेक्षकांना तुफान आवडत आहे. गाण्याचं आकर्षण म्हणजे कुणाल करण यांचे भन्नाट शब्द आणि मस्त बिट्स, नकाश अझीझ यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे. यामुळे या गाण्याची रंगतदार रेसिपी तयार झाली असून ती प्रेक्षकांना चविष्ट अनुभव देणार आहे.

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ चा ट्रेलर रिलीज, विनोदासोबत उलघडणार शेतकऱ्यांची वेदनादायी कथा

या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसाद ओक म्हणाले, “आमचं लक्ष्य फक्त गाणं बनवणं नव्हतं, तर मुंबईचा आत्मा टिपणं होतं. हे टायटल ट्रॅक प्रत्येकाला नाचवणार, यात अजिबात शंका नाही.” असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

 

तसेच या गाण्याबद्दल संगीतकार, गीतकार कुणाल – करण म्हणाले, ”हे गाणं लिहिताना आणि संगीत ठरवताना आमच्या डोक्यात एकच विचार होता, वडापाव जसा साधा असूनही झणझणीत आहे, तसंच हे गाणं असावं. शब्द साधे, तरीही थेट मनाला भिडणारे आणि संगीत असं की, ऐकताच पाय आपोआप थिरकायला लागतील. हे टायटल ट्रॅक म्हणजे फक्त गाणं नाही, तर मुंबईतील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे.”

२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा ‘वडापाव’ हा पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये गोड नात्यांची चवदार गोष्ट पाहायला मिळणार असून, टायटल ट्रॅकने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे हे सगळे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. या चित्रपटामधील गंमत आणि मजेदार गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.

Web Title: Title track of the movie vadapav released the movie will be released on 2nd october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • prasad oak

संबंधित बातम्या

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’
1

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ चा ट्रेलर रिलीज, विनोदासोबत उलघडणार शेतकऱ्यांची वेदनादायी कथा
2

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ चा ट्रेलर रिलीज, विनोदासोबत उलघडणार शेतकऱ्यांची वेदनादायी कथा

करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
3

करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात नवा राडा, मृदुल आणि शाहबाज एकमेकांना भिडले; नक्की घरात काय घडले?
4

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात नवा राडा, मृदुल आणि शाहबाज एकमेकांना भिडले; नक्की घरात काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.