Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या ठेक्याला नव्या झंकाराची भेट! ‘दिसला गं बाई दिसला २.०’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

'दिसला गं बाई दिसला' या अजरामर गाण्याच्या रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2025 | 09:20 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘दिसला गं बाई दिसला २.०’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस
  • अजरामर गाण्याच्या रिमेकला प्रेक्षकांचा प्रतिसाद
  • चित्रपट २१ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच, या चित्रपटातील तिसरं गाणं ‘दिसला गं बाई दिसला २.०’ सध्या प्रचंड गाजतं आहे. आधीच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पहिल्या दोन गाण्यांनंतर हे गाणंही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये झळकू लागलं आहे. ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या नव्या आवृत्तीने जुन्या आठवणींना नवा झगमगाट दिला आहे. गौतमी पाटीलच्या अफाट एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त साथीनं या गाण्याला एक वेगळंच रूप मिळालं आहे.

५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज “कांतारा चॅप्टर १”, १३ व्या दिवशी चित्रपटाचा नवा रेकॉर्ड

राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांच्या जोशपूर्ण संगीतासह जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांचे बोल लाभलेलं हे गाणं अधिकच श्रवणीय बनले आहे. राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या आवाजात हे गाणं आणखीनच रंगतदार झालं आहे. पॉल मार्शलच्या चैतन्यपूर्ण नृत्यदिग्दर्शनाने यात अधिकच रंगत आली आहे. हे गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीस येण्याचं कारण म्हणजे, गाण्याचे पूर्वीचे बोल आणि नव्या बीट्सचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. पारंपरिक तालात आधुनिक झंकाराची मिसळ, आणि गौतमी पाटीलच्या स्फूर्तीदायक सादरीकरणामुळे हे गाणं तरुणाईचं नवीन आवडतं गाणं बनत आहे.

 

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, ‘हे गाणं तयार करतानाच आमच्या मनात तरुणाई होती. जुनं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचं होतं, परंतु त्याचा सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला जिवंतपणा आला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं आकर्षण ठरलं आहे.” असे ते म्हणाले.

विरोधानंतर ‘मना’चे श्लोक आता नवीन नावासह प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तसेच पुढे निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, ” ‘प्रेमाची गोष्ट २’ मधली पहिली दोन गाणी प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली आणि त्यांच्या प्रतिसादाने आम्ही आणखी उत्साहित झालो आहोत. आता ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या गाण्याने तो उत्साह आणखी वाढवला आहे. जुना ठेका आणि नव्या तालाची सांगड हाच या गाण्याचा आत्मा आहे.” असे ते म्हणाले.

‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ‘प्रेम आणि नशिबाचा जादुई प्रवास’ २१ ऑक्टोबरला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Web Title: Gautami patil new song disla ga bai disla remake from premachi goshta 2 movie release on 21october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • entertainment
  • Gautami patil
  • marathi movie

संबंधित बातम्या

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड
1

धनुषच्या चाहत्यांना पोंगलचे मिळाले सरप्राईज; अभिनेत्याने पुढच्या चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज, निर्मात्यांनी शीर्षकही केले उघड

बॉलीवूड अभिनेता दीपक तिजोरींची मोठी फसवणूक! ५ लाख रुपयांना गंडा; तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल
2

बॉलीवूड अभिनेता दीपक तिजोरींची मोठी फसवणूक! ५ लाख रुपयांना गंडा; तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल

Ek Din : जुनैद आणि साई पल्लवी दिसले एकत्र, आगामी चित्रपटाच्या पोस्टरने वेधले लक्ष, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
3

Ek Din : जुनैद आणि साई पल्लवी दिसले एकत्र, आगामी चित्रपटाच्या पोस्टरने वेधले लक्ष, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Mayasabha: IMDb वर रिलीजआधीच 8.3 रेटिंग! “तुंबाड” दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटाची पुरेशी आहे एक झलक
4

Mayasabha: IMDb वर रिलीजआधीच 8.3 रेटिंग! “तुंबाड” दिग्दर्शकाच्या आगामी चित्रपटाची पुरेशी आहे एक झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.