Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमचा ट्रेलर बघू नका!’, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन, कारण सांगत म्हणाले…

सध्या मराठी चित्रपट 'गोंधळ' चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन ऐकून चाहते चकीत झाले आहेत. 'गोंधळ' या आगामी चित्रपटाबद्दल ते नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 28, 2025 | 03:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘गोंधळ’ चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज?
  • ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन
  • दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले काय?
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला सन्मान देणारे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अशाच परंपरेचा गाभा उलगडणारा बहुचर्चित ‘गोंधळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या उत्सुकतेत भर घालत दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एक अनोखे आवाहन केले आहे, “आमचा ट्रेलर बघू नका!” असे ते म्हणाले आहेत. आता ते असं का म्हणाले जाणून घेऊयात.

अखेर The Family Man 3 ची संपली प्रतीक्षा, ‘या’ दिवशी २४० हून अधिक देशांमध्ये होणार जागतिक प्रीमियर

आजकाल जिथे चित्रपटांच्या ट्रेलरचे जोरदार प्रमोशन केले जाते, तिथे ‘गोंधळ’ टीमने वेगळा प्रयोग केला आहे. दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात की, त्यांनी प्रेक्षकांना ट्रेलर न पाहाण्याचे आवाहन करून चित्रपटाबद्दलची कुतूहल वाढवण्याचा मानस ठेवला आहे. सोशल मीडियावर ही प्रमोशन स्ट्रॅटेजी सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे आणि प्रेक्षक या निर्णयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत. आता ट्रेलर नाही म्हणून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढेल यात शंकाच नाही.

 

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “‘गोंधळ’ची कथा, पात्रे आणि कलाकार अतिशय रंजक आहेत; त्यामुळे प्रेक्षकांनी ट्रेलरपेक्षा संपूर्ण चित्रपट थेट सिनेमागृहात बसून पाहावा. प्रत्येक भूमिकेचं चित्रपटामध्ये हळूहळू गूढ उलगडत जाणार आहे. नाहीतर चित्रपटातील थ्रिल थोडा २-३ टक्के कमी होऊ शकतो. चित्रपट पाहिल्यानंतरच या कथेचा गाभा, भावना आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा खरा रंग प्रेक्षकांना जाणवेल. ज्यांना चित्रपटाबद्दल काही शंका असतील, त्यांनीच ट्रेलर पाहावा. काही गोष्टी या चित्रपटात अशा आहेत ज्या ७० एमएम पटलावर प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच दिसतील.” असे ते म्हणाले आहेत.

‘रील स्टार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस, प्रसाद ओकसह दिसणार ‘ही’ तगडी स्टारकास्ट

डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके यांसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘गोंधळ’ चित्रपटाचे मेकिंग यूट्यूबवर प्रदर्शित झाले असून चित्रपटात दमदार टीम असल्याचे दिसतेय. दरम्यान, ट्रेलर न पाहाण्याचे हे आवाहन प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढ करेल की कमी, याचा परिणाम लवकरच दिसून येणार आहे.

Web Title: Gondhal teaser kishor kadam ishita deshmukh santosh davakhar marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा
1

Iran News : मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी’; पेझेश्कियन यांचा मोठा दावा

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला
2

Iran – US : युद्ध काय थांबत नसते ; इराणचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
3

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.