
फोटो सौजन्य AI
रशिया युक्रेनवर हल्ला करेल अशी शंका आधीच मनात होती , आणि झाले ही तसेच रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेन ने आपली चिकाटी आणि निश्चय दाखवत रशियाला सडेतोड उत्तर दिले . अमेरिकेने शस्त्रे पुरवली , नाटो विमाने घेऊन मदतीला आला . युक्रेनबरॊबर रशियाला सुद्धा बराच तोटा झाला .
आणि या अशा तोट्यात असताना एका दुसऱ्या बाजूला म्हणजेच युरोपवर हल्ला करून युद्धाचा फ्रंट खोलने हे सध्या तरी पुतीन यांना शक्य नसल्याचे बोलले जात आहे . त्यात भरीस भर म्हणून अमेरिकेने रशियावर निर्बंध लावले असताना भारता सारख्या मोठ्या देशाने त्यांच्याकडून तेल खरेदी करणे बंद केल्याने सुद्धा रशियावर परिणाम पडला असल्याचे बोलले जाते .
अशातच रशिया आणि युरोपीय देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. रशिया युरोपसोबत कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची तयारी करत नसल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. सेंट पीटर्सबर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी युरोपसोबत परिस्थिती चिघळवण्याचे कोणतेही ठोस कारण रशियाकडे नसल्याचे सांगितले.
Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट
NATOच्या काही युरोपीय सदस्य देशांकडून रशियाकडून भविष्यात हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली. युरोपसोबत संघर्ष करण्याची तयारी मॉस्को करत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रशियाकडून युरोपविरोधात परिस्थिती बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचा दावा त्यांनी केला.
पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, रशिया आणि युरोपमधील परिस्थिती अधिक चिघळवण्यामागे कोणतेही ठोस कारण नाही. त्यामुळे युरोपीय देशांनी रशियाच्या हालचालींकडे संघर्षाच्या दृष्टीने पाहू नये, असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला. मात्र, युरोपातील काही देशांकडून रशियाच्या लष्करी क्षमतेबाबत आणि भविष्यातील हालचालींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
रशिया आणि युरोपीय देशांमधील संबंधांवर युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून NATO आणि रशिया यांच्यातील तणाव वाढला आहे. युरोपीय देशांकडून युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत दिली जात असताना रशियाकडून त्याला विरोध केला जात आहे.
अशा परिस्थितीत पुतिन यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. युरोपसोबत थेट संघर्ष टाळण्याची भूमिका रशियाने पुन्हा स्पष्ट केली असली, तरी युक्रेनमधील युद्धामुळे दोन्ही बाजूंमधील तणाव कायम आहे.