
फोटो सौजन्य AI
इराण आपल्या अटींवर कायम आहे तर अमेरिका सुद्धा यावर तोडगा म्हणून सगळे इराणच्या नवीन प्रस्तावावर नजर ठेवून होते . पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराणने मांडलेल्या प्रस्तावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे.
इराणचा प्रस्ताव ‘अस्वीकार्य’ असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थांमार्फत चर्चा सुरू असतानाच ट्रम्प यांची ही भूमिका समोर आली आहे.
UN 2026 : तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
इराणने अमेरिकेसमोर युद्धविराम आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेने लष्करी दबाव कमी करावा आणि इराणवरील आर्थिक नाकेबंदी शिथिल करावी, अशी भूमिका इराणने मांडली. या अटींवर सहमती झाल्यास सात दिवसांच्या कालावधीत होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणने दर्शवली होती.
Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
पर्शियन आखात आणि अरबी समुद्राला जोडणारी होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मार्गातून मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने ऊर्जा बाजारावर आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून होर्मुझमधून मुक्त आणि सुरक्षित जहाजवाहतुकीवर भर दिला जात आहे, तर इराणकडून त्याबदल्यात अमेरिकेने दबाव कमी करण्याची मागणी केली आहे.
Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट
इराणचा प्रस्ताव समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील चर्चेत पुन्हा मतभेद निर्माण झाले आहेत. इराणकडून राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची तयारी व्यक्त केली जात असली, तरी अमेरिकेने दबाव कमी करण्यापूर्वी आपल्या प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात अशी भूमिका घेतली आहे. परिणामी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे खुली करण्याचा प्रश्न अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.