Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन हॉरर वेब सिरीज ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’ हिंदी आणि मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला!

सध्या मराठी चित्रपट धमाका करत आहेत. आता अशातच अल्ट्रा झकास ओटीटी नवीन हॉरर वेब सीरिज प्रदर्शित केली आहे. ज्याचे नाव आहे ‘खोताची वाडी – एक शापित वास्तू’. ही वेब सीरिज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 16, 2026 | 02:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजनविश्व भय आणि रहस्याचा नवा अध्याय उघडण्यासाठी सज्ज झालेलं आहे. राजेश चव्हाण यांच्या दिग्दर्शनाखाली एक थरारक अल्ट्रा झकास ओरिजिनल हॉरर ‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. ही वेब सीरिज अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठी भाषेत आणि अल्ट्रा प्ले ओटीटीवर हिंदी भाषेत २३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ ही कथा सानिका नावाच्या एका तरुणीभोवती फिरते, जी एका प्राचीन वाड्याशी संबंधित अदृश्य रहस्य, भयानक आणि अकल्पित घटनांमध्ये अडकते. हा वाडा एका क्रूर आत्म्याशी धर्मसेन जोडलेला आहे, जो आपल्या लोभामुळे मृत्यूनंतरही आपल्या खजिन्याचे रक्षण करत असतो. या प्रवासात सानिकाला अनाकलनीय शक्तींचा अनुभव येतो, तिचे रूप बदलते आणि ती धर्मसेनाची पत्नी हेमावतीच्या छायेत अडकते.

फ्रेश जोडी, फ्रेश रोमॅन्स! ‘एक दिन’च्या टीझरमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खानने जिंकली प्रेक्षकांची मने

या वेब सिरीजमध्ये एका जुन्या वाड्याच्या बंद दारांमागे अनेक वर्षांचं अदृश्य रहस्य आणि एक भयानक शाप दडलेलं पाहायला मिळणार आहे . या वाड्यात दडलेला आहे विज्ञानाच्या पलीकडचा अदृश्य शक्तींचा खेळ, जिथे भूतकाळातील चुका वर्तमानात भयानक रूपाने समोर येताच थराराचा न थांबणारा प्रवास सुरू होतो. चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सुहास जोशी एका अत्यंत वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘मुंज्या’ चित्रपटातील आजीच्या भूमिकेप्रमाणेच, ही भूमिका कथेला वेगळीच गहनता देणारी ठरेल. सोबत सानिया चौधरी, अभिनय सावंत, रोशन विचारे, तसेच सध्या मराठी मालिकाविश्वात प्रचंड लोकप्रिय असलेले कश्यप परुळेकर आणि नयन जाधव हे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पहायला मिळणार आहेत.

Daldal Teaser : ‘दलदल’ या खतरनाक वेब सीरिजचा टीझर रिलीज; भूमी पेडणेकर दिसणार अनोख्या शैलीत

ही सिरीज सध्या मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, लवकरच ती कन्नड भाषेसह अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित न राहता, देशभरातील प्रेक्षकांना भय, रहस्य आणि थराराचा अनुभव देणार आहे. भय, भावनिक नाती, आत्मिक संघर्ष आणि स्त्रीशक्तीचा प्रभावी प्रवास दाखवणारी ‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ ही केवळ एक हॉरर कथा नाही, तर स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहण्याची आणि अंधारावर मात करण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.

Web Title: Horror series khotachi wadi to unravel secrets of a haunted mansion releasing on ott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • OTT Release

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Fauji Marathi Movie: शून्यातून उभा राहिला ‘फौजी’! जिद्द, संघर्ष अन् देशप्रेमाची कहाणी; ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Fauji Marathi Movie: शून्यातून उभा राहिला ‘फौजी’! जिद्द, संघर्ष अन् देशप्रेमाची कहाणी; ‘या’ दिवशी होणार रिलीज

OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी
3

OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.