(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी रोमँटिक ड्रामा फिल्म ‘एक दिन’ अखेर तिच्या टीझरसह प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, साई पल्लवी आणि जुनैद खान यांची क्युट, फ्रेश आणि मनमोहक जोडीने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सॉफ्ट, क्लासिक आणि भावनिक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच चित्रपटाच्या पोस्टरने देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
हिवाळ्यातील बर्फाच्छादित सुंदर दृश्यांपासून सुरू होणारा ‘एक दिन’चा टीझर हृदयाला स्पर्श करणाऱ्या संवादांसह पुढे सरकतो. पार्श्वसंगीतातील गोड, सुकून देणारी धून प्रेमाच्या भावना अधिक गहिऱ्या करते. साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्री टीझरमधूनच प्रेक्षकांना जाणवत आहे आणि आजच्या काळात क्वचितच दिसणाऱ्या अशा रोमँटिक लव्ह स्टोरीचे वचन देणारी आहे, जी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेमाची जादू अनुभवायला मिळणार आहे.
घटस्फोटाच्या २ वर्षानंतर धनुष करणार दुसरे लग्न? वयाने नऊ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीला करतोय डेट?
साऊथ सिनेमाची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी साई पल्लवी या चित्रपटातून तिचा बहुप्रतिक्षित हिंदी डेब्यू करत आहे. तिचा सिग्नेचर ग्रेस, साधेपणा आणि अभिनयातील खोली टीझरमध्येच लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे जुनैद खान एका नव्या, इमोशनल झोनमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने दिसतो आहे. त्याच्या अभिनयातील निरागसता आणि चार्म या प्रेमकथेला अधिक रिअल आणि खास बनवत आहे. ही ऑन-स्क्रीन जोडी पहिल्याच झलकमध्ये ताजी आणि जादुई वाटत आहे.
‘एक दिन’च्या निमित्ताने आमिर खान आणि मंसूर खान यांचे दीर्घकाळानंतर पुन्हा एकत्र येणे हे या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण आहे. यापूर्वी या जोडीने कयामत से कयामत तक, जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जाने तू… या जाने ना यांसारख्या अजरामर रोमँटिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे ‘एक दिन’कडूनही तितकीच खास आणि लक्षात राहणारी प्रेमकथा प्रेक्षकांना मिळणार आहे, अशी अपेक्षा आहे.
२२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न, रसिकांनी घेतला ५६ चित्रपटांचा आस्वाद
आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘एक दिन’ चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून, आमिर खान, मंसूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रोमॅन्स आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘एक दिन’ नक्कीच एक खास सिनेमॅटिक अनुभव ठरणार, यात शंकाच नाही आहे.






