Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सखुला भेटण्यासाठी कराडचे ग्रामस्थ थेट पोहचले सेटवर, ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेची केली प्रशंसा

‘सन मराठी’ वाहिनीवरील 'सखा माझा पांडुरंग' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या मालिकेचा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. कराडचे ग्रामस्थ या मालिकेच्या कास्टला भेटण्यासाठी थेट सेटवर पोहचले.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2025 | 08:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेचे चाहत्यांना क्रेझ
  • सखुला भेटण्यासाठी कराडचे ग्रामस्थ थेट सेटवर
  • ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत नवा ट्विस्ट
‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सखा माझा पांडुरंग’ ही मालिका महिला संत सखुबाई यांच्या थोर जीवनावर आधारित आहे. या मालिकेद्वारे संत सखुबाईंचं प्रेरणादायी जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर उलगडत आहे. विठ्ठलाच्या निस्सीम भक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखुबाईंचं नाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांमध्ये आदराने घेतलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रात महिला संत सखूबाईंचं एकमेव मंदिर हे कराड येथे आहे. संत सखुबाई या कराड मधल्या असल्याने तेथील ग्रामस्थ मालिका आवर्जून पाहतात. ‘सखा माझा पांडुरंग’ ही मालिका सायंकाळी ७:३० वाजता ‘सन मराठी’वर प्रक्षेपित होते.

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात नवा राडा, मृदुल आणि शाहबाज एकमेकांना भिडले; नक्की घरात काय घडले?

मालिकेत सखुबाई यांच्या बालपणीची भूमिका स्वराली खोमणेने साकारली आहे. तिच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे. वयाच्या १० व्या वर्षी स्वरालीने तिच्या अभिनयाने साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. स्वरालीचं कौतुक करण्यासाठी संत सखुबाई मंदिर आणि विठ्ठलदेव आणि त्र्यंबक देव ट्रस्ट, कराड येथून संजीव सराटे, शार्दुल चरेगावकर आणि सुरेंद्र काळे हे मान्यवर थेट मालिकेच्या सेटवर पोहोचले. योगायोग म्हणजे त्याच दिवशी स्वरालीचा वाढदिवस असल्याने सेटवर केक कटिंग करत जोरदार सेलिब्रेशन पार पडलं.

 

करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

याचनिमित्ताने संजीव सराटे आणि शार्दुल चरेगावकर म्हणाले, “संत सखुबाई या अशा संत आहेत ज्यांना प्रत्यक्ष विठुरायाचा सहवास लाभला. त्यांच्यावर आधारित मालिका आजच्या काळात येणं गरजेचं होतं आणि ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेमुळे हे शक्य होतं आहे. आमच्या गावासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मालिका खूप सुंदर पद्धतीने सुरु आहे. त्यात स्वराली ही बालकलाकार म्हणून तिचं काम उत्तम रित्या पार पडत आहे. त्यामुळेच आज आम्ही कराड वरून मुंबईमध्ये आलो आहोत. खरंच ‘सन मराठी’ वाहिनीचे आणि मालिकेत मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. मालिकेच्या माध्यमातून सखूबाईंची कथा त्यांचा प्रवास घराघरात पोहोचला पाहिजे.”

Web Title: Karad villager meets the entire star cast of the series sakha mazha pandurang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
1

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!
2

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा
3

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
4

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.