Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुढीपाडव्यानिमित्त अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिली गुड न्यूज; नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘मोठं स्वप्न…’

गुढीपाडव्यानिमित्त अंकिता वालावलकर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अंकिता वालावलकरने नुकतेच एक घर घेतलं असल्याचे समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 19, 2026 | 04:01 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत या जोडप्यानी त्यांच्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. मुंबईत स्वतःचं घर असावं, ही अनेकांची इच्छा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत घ्यावी लागते. अशाच संघर्षातून जात या दोघांनी अखेर त्यांच्या हक्काचं घर घेतलं असून ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकरने इन्स्टाग्रामवर घराचे फोटो शेअर करत एक भावनिक कॅप्शन देखील लिहिले आहे, या कॅप्शने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने तिच्या प्रवासाबद्दल सांगताना लिहिलं की, “घर घेणं हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती.” मुंबईत सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधताना तिच्या मनात कायम एकच प्रश्न असायचा—“माझं घर कधी?”

‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक टीझर लवकरच; ‘धुरंधर-द रिव्हेंज’सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार पहिली झलक

तिने पुढे लिहिले, ‘स्वप्नं नेहमी आपल्या क्षमतेपेक्षा मोठी पाहावीत, कारण क्षमता आपण वाढवू शकतो. पण छोटं स्वप्न कधीच मोठं होत नाही. पेडर रोडवरून जाताना ती अनेकदा अँटिलिया समोर उभी राहायची आणि “एक दिन मेरा भी घर होगा” अशी स्टोरी शेअर करायची. तिच्यासाठी ती केवळ स्टोरी नव्हती, तर एक प्रार्थना होती. विशेष म्हणजे, आज ज्या टॉवरमध्ये त्यांनी घर घेतलं आहे, त्याचं नावही ‘अँटिलिया’ असल्याचा योगायोग तिने शेअर केला आहे.

 

तिच्या प्रवासात अनेक अडचणी देखील आल्या आहेत. याबद्दल सांगताना अंकिता म्हणाली, “मुंबईत रोटी कमावणं सोपं आहे, पण स्वतःचं घर घेणं खूप कठीण आहे,” असं ऐकूनही ती कधीच मागे हटली नाही. लग्नानंतर हे स्वप्न तिचं आणि कुणालचं दोघांचं झालं. वर्षभर त्यांनी अनेक घरे पाहिली, पण मनाला पटेल असं घर सापडत नव्हतं. शेवटी एक दिवस अचानक त्यांना हे घर सापडलं आणि पहिल्याच क्षणी मनाने “हेच!” असं सांगितलं.

‘तुंबाडची मंजुळा’चे गुढीपाडवाच्या निमित्ताने नवं पोस्टर रिलीज; काळ्या पोपटामागचं रहस्य नक्की आहे काय?

तसेच ती पूढे म्हणाली, ‘तरीही निर्णय सोपा नव्हता. आर्थिक गणित जुळत नव्हतं, भविष्याची भीती होती. पण त्या क्षणी त्यांनी धाडस केलं. “उडी मारली की पोहायला येतंच,” असं म्हणत त्यांनी रिस्क घेतली. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही, पण त्यांच्या स्वप्नावरचा विश्वास अधिक मजबूत होता. शेवटी त्यांनी भीतीपेक्षा मोठं स्वप्न निवडलं.

आज त्यांच्या हातात घराच्या चाव्या आहेत आणि मनात समाधानाची भावना. “ही जागा छोटी असेल, पण आमची आहे. अभिमान पैशांचा नाही, तर त्या प्रवासाचा आहे,” असं म्हणत अंकिताने तिचा आनंद व्यक्त केला. तिने शेवटी चाहत्यांना एक प्रेरणादायी संदेश दिला—“लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. उशीर झाला तरी चालेल, पण जिद्द जिवंत ठेवा. कारण घर जिद्दीनेच बांधलं जातं.” एकेकाळी ‘अँटिलिया’ कडे पाहत स्वप्न पाहणारी अंकिता आज स्वतःच्या ‘अँटिलिया’मध्ये उभी आहे—आणि तिची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांना चाहते शुभेच्छा देत आहेत.

 

Web Title: Konkan hearted girl ankita walawalkar dream come true buys new home in mumbai panvel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • ankita prabhu walawalkar
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.