(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
१० जुलै रोजी संध्याकाळी मुंबईत मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५ चा हा यशस्वीरीत्या पार पडला आहे. या अवॉर्ड कार्यक्रमात मोठमोठ्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर एन्ट्री केली. सगळे उपस्थित राहिलेल्या कलाकारांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह आणि आनंद दिसला. नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते निक्की तांबोळी, अमृता सुभाष ते शिव ठाकरे यांच्यापर्यंत, रेड कार्पेट अनेक कलाकार चमकले. तसेच अनेक मराठी कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार देखील मिळाला आहे.
मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आणखी दोन आव्हान, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेला नवीन ट्रॅक
याचदरम्यान आता, आजवर वैविध्यपूर्ण कलाकृती मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता क्षितीश दाते हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि याच कारण देखील तितकच खास आहे. ‘धर्मवीर 2’ साठी फिल्मफेअर 2025 बेस्ट सपोर्टींग अभिनेता हा खास पुरस्कार क्षितीशला मिळाला आहे. हा त्यांचा पहिला वहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता या पुरस्कसाठी खूप आनंदी झाला आहे.
‘धर्मवीर 2’ मधल्या त्यांचा कामासाठी हा खास पुरस्कार अभिनेत्याला देण्यात आला आहे. त्याने पुन्हा एकदा या भूमिकेची ताकद दाखवून दिली आहे. ‘धर्मवीर 2’ मध्ये त्याने माननीय एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेला हा सर्वोच्च पुरस्कार देखील मिळाला आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटामध्येही अभिनेत्रीने लक्षवेधी भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांसोबत निर्मात्याची देखील प्रशंसा मिळवली होती.
मराठी- हिंदी भाषेच्या वादावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया; म्हणाली ‘मी महाराष्ट्रीय मुलगी…’
सध्या क्षितीश दाते हॉटस्टारच्या ‘मिस्त्री’ वेब शो मध्ये काम करताना दिसला आहे. धर्मवीर, मुळशी पॅटर्न, फुलवंती, असे लोकप्रिय चित्रपट असो किंवा नुकतंच आलेलं ‘मी vs मी’ नाटक असो क्षितीशची अभिनयशैली ही कायम चर्चेत राहणारी ठरली आहे आणि म्हणून ‘मिस्त्री’ मधला पोलीस बंटी देखील तेवढाच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. ‘मिस्त्री’ ही वेब सिरीज जिओ हॉटस्टार वर रिलीज झाली आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.