(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतेच तिच्या आगामी चित्रपट ‘केडी द डेव्हिल’ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये भाग घेतला. येथे तिला मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाबद्दल विचारण्यात आले. शिल्पा शेट्टीने यावर भाष्य करण्यास नकार दिला. तिने सांगितले की तिला कोणत्याही प्रकारच्या वादाला प्रोत्साहन द्यायचे नाही. तसेच या चित्रपटाबद्दल आपण बोलूयात असे अभिनेत्री म्हणाली.
शिल्पाने प्रश्नांकडे केलं दुर्लक्ष
शिल्पा शेट्टी गुरुवारी मुंबईत आली आणि तिच्या आगामी ‘केडी-द डेव्हिल’ चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमात कन्नड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या दरम्यान तिला मराठी भाषेच्या वादावर विधान करण्यास सांगितले गेले होते परंतु तिने प्रश्न टाळला आणि तिचे मूळ ‘मराठी मुलगी’ असल्याचे सांगितले.
Shilpa Shetty and Sanjay Dutt on the Hindi-Marathi language dispute.
The question was posed by Priyanka from Jagran.#MarathiLanguageRow pic.twitter.com/CNq3PVwdsF
— Amit Karn (@amitkarn99) July 10, 2025
संजय दत्तने शिल्पाला पाठिंबा दिला
शिल्पा शेट्टी म्हणाली, ‘मी महाराष्ट्राची मुलगी आहे. आज आपण केडी चित्रपटाबद्दल बोलत आहोत. जर तुम्ही इतर कोणत्याही वादाबद्दल बोलत असाल तर मी त्याचे प्रमोशन करू शकत नाही. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आम्ही तो मराठीतही डब करू शकतो.’ असे अभिनेत्री म्हणाली. शिल्पा शेट्टीचा सहकलाकार अभिनेता संजय दत्तनेही अभिनेत्रीला पाठिंबा दिला.
‘इंद्रायणी’ करणार गुरु माहात्म्य सांगणारे खास कीर्तन, मालिकेत मिळणार भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास
मराठी भाषेचा वाद नक्की काय आहे ?
राज्य सरकारने जेव्हा राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून समाविष्ट करण्याची योजना आखली तेव्हा मराठी भाषेचा वाद सुरू झाला. राज्यातील विरोधी आणि भाषा समर्थक गटांनी या आदेशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप सरकारने आपला आदेश उलटवला असला तरी, त्यावरील वाद अजूनही सुरू आहे.
शिल्पाच्या चित्रपटाबद्दल
शिल्पा शेट्टी लवकरच ‘केडी द डेव्हिल’ चित्रपटात दिसणार आहे. शिल्पा व्यतिरिक्त ध्रुव सरजा, संजय दत्त, रेशमा नानैया, रमेश अरविंद, रविचंद्रन असे मोठे स्टार या चित्रपटात दिसतील. चित्रपटाचा टीझर १० जुलै रोजी प्रदर्शित झाला. दोन मिनिटांचा हा टीझर कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला.