(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय आहे म्हणूनच अनेकदा मोठ्या पडद्यावर प्रेम कथा प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी चित्रपटामधील घटस्फोट सोहळ्याचे एक अनोखे टीझर पोस्टरही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. या नव्या पोस्टरमध्ये संपूर्ण नवी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.
शारदा फिल्म्स प्रोडक्शनच्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या “मंगलाष्टका रिटर्न्स” या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने युके दौरा ढकलला पुढे, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!
राजकीय विरोधाची पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबातील तरुण-तरुणी एकाच कॉलेजमध्ये एकमेकांना भेटतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडत जातात याची रंजक कहाणी “मंगलाष्टका रिटर्न्स” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सुलट प्रेमाची उलट गोष्ट या टॅगलाइनमुळे या गोष्टीत अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळणार आहे याचा अंदाज आलाच आहे. त्यामुळेच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्टरचा लुकही अगदी नवा आहे. त्यामुळे ही गोष्ट अनुभवण्यासाठी २३ मेपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मकरंद देशपांडे यांनी केला निषेध, म्हणाले ‘सरकारला पाठिंबा देण्याची गरज…’
अभिनेत्री शीतल अहिरराव आणि अभिनेता वृषभ शाह ‘मंगलाष्टक रिटर्न’ या चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहे. कलाकार म्हणून या दोघांनी अत्यंत चांगले काम सादर केले आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटामध्ये नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे रहस्य उलगडणार याकडे रसिक प्रेक्षकांच्या लक्ष वेधले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माता वीरकुमार शहा यांनी सांभाळली असून, त्यांच्या ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.