
फोटो सौजन्य सोशल मीडिया
याची प्रचिती आपण नेपाळ मध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये बघितली आहे . जगातील देशांकडून हवामान बदल रोखण्यासाठी अनेक आश्वासःने दिली जात असली तरी प्रत्यक्षात हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत . सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान २.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते , असा गंभीर इशारा आता संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने दिला आहे .
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP ) Emissions Gap Report २०२६ मध्ये हवामान बदलासंदर्भात धक्कादायक वास्तव जगासमोर मांडण्यात आले आहे . औद्योगिक क्रांतीपूर्व तापमानाच्या तुलनेत जागतिक तापमानवाढ १.५ अंशाच्या मर्यादेत ठेवण्याची संधी आता संपली आहे . सर्वात अनुकूल परिस्थितीतही २०५० च्या आसपास तापमानवाढ १.७ ते १.८ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे . मात्र योग्य उपाययोजना केल्यास या शतकाच्या अखेरीस तापमान पुन्हा १.५ अंशाच्या खाली आणण्याची संधी कायम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे .
जगासमोर आता एक काम आहे जर हवामान बदलाचा वेग कमी करायचा असेल तर जगाला हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात मोठी कपात करावी लागणार आहे . २०२५ च्या तुलनेत २०३० पर्यंत उत्सर्जन १८ टक्के ,२०३५ पर्यंत ४५ टक्के आणि २०४० पर्यंत ६९ टक्क्यांनी कमी करण्याची गरज आहे . २०२५ च्या तुलनेत २०३० पर्यंत केवळ ५ ते ८ टक्के कपात होण्याचा अंदाज आहे .
त्यामुळे देशांच्या आश्वासनामध्ये आणि खऱ्या कृतीमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे . यामुळे आता तरी जगातील सगळ्या देशांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगले वातावरण आणि चांगल्या अस्वस्थेतली पृथ्वी देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील .
Breaking News : मृत्यूचा तांडव ;१५० जणांचा जागीच मृत्यू ;सुदानमधील वाद टिपेला
तापमानवाढीचा परिणाम केवळ पर्यावरणापुरता मर्यादित राहणार नसून मानवी जीवन, शेती, पाणीपुरवठा आणि अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. समुद्राच्या पातळीत वाढ, हिमनद्या वितळणे, अतिवृष्टी, जंगलातील वणवे आणि तीव्र उष्णतेच्या लाटा यांसारख्या संकटांची तीव्रता वाढू शकते.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही देशांना उत्सर्जन कपातीसाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. आगामी COP31 हवामान परिषदेत या मुद्द्यांवर जागतिक स्तरावर चर्चा होणार आहे. आता केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे.