Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phula Movie: ‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा, चित्रपटाचे पोस्टर आणि म्युझिक लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न

हा चित्रपट वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीवर आधारित असून, एका स्त्रीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांसमोर आणत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 14, 2026 | 09:30 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम ऐकायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील नवोदित तरुणांनी तयार केलेल्या Phula चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीवर आधारित आणि एका स्त्रीच्या संघर्षाची कहाणी सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे.

सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार, Rajiv Khandekar, एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट प्रमुख उपस्थित होते. याशिवाय, सॅक्सोफोन वादक Raj Soda आणि चित्रपटाची संपूर्ण टीमही उपस्थित होती.

हा चित्रपट नवोदित तरुणांच्या मेहनतीला आणि पारंपरिक संगीताला मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रोत्साहन देणार आहे. सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम प्रेक्षकांना ऐकायला मिळणार असून, संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी Phula चित्रपटाची निर्मिती केली असून, शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

‘Lagaan’च्या सेटवर जाण्यापूर्वी ऐकला जायचा ‘हा’ मंत्र, Aamir Khanचा खुलासा; म्हणाला ”त्यामुळे त्याला…”

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे असून, पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे, तर सर्जनशीर दिग्दर्शन अमर देवकर, गीतलेखन रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे, छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे, आणि संकलनाची जबाबदारी राहुल प्रजापती यांनी पाहिली आहे.

चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव, वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील, तर रंगभूषाकार समाधान भोरे यांनी केले आहे.

याप्रसंगी राजीव खांडेकर म्हणाले..आपल्या सर्वांना आपल्या लोककला, लोकपरंपरा याचा अभिमान असतो. ज्या कलाकारांना डोक्यावर घेऊन आपण ज्या कलाकारांचं कौतुक करतो अशा कलाकारांचं प्रत्यक्षातील आयुष्य कस असतं यावर प्रत्यक्षपणे प्रकाश टाकण्याचं प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे . नव्या दमाच्या तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट केला आहे. वाघ्या मुरळींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटाला आपण प्रेक्षक म्हणून नक्कीच साथ दिली पाहिजे

“फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायाकडे ढकलते…”, बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा; म्हणाली, “कलाकारांना वापरून…”

“फुला” ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग, डर्बीचा थरार ही सात गाणी या चित्रपटात आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यातून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचं चित्रण करत मुरळीच्या भावभावनाही मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अस्सल लोकसंस्कृती आणि आशयघन गाणी असलेला “फुला” हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं हा एक अनुभव ठरणार आहे. येत्या १७ एप्रिलपासून “फुला” हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीवर आधारित असून, एका स्त्रीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांसमोर आणत आहे. सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम आणि अस्सल संगीताच्या मेजवानीसह, Phula मराठी चित्रपटसृष्टीत नवोदित कलाकारांना व पारंपरिक संगीताला नवीन ओळख देणार आहे.

Web Title: Phula film poster and music launch ceremony concludes with enthusiasm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज! OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण लिस्ट
1

एंटरटेनमेंटचा ओव्हरडोज! OTT वर ‘या’ आठवड्यात रिलीज होणार ‘या’ दमदार चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण लिस्ट

“पप्पा, पप्पा”च्या हाकांमध्ये रंगले शूटिंग; सुहास शिरसाटचा खास अनुभव, भूमिकेबद्दल मारल्या मनमोकळ्या गप्पा
2

“पप्पा, पप्पा”च्या हाकांमध्ये रंगले शूटिंग; सुहास शिरसाटचा खास अनुभव, भूमिकेबद्दल मारल्या मनमोकळ्या गप्पा

झी झेस्ट अनलिमिट अवॉर्ड्स 2026: फूड आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील ‘रीडिफायनिंग एक्सीलेंस’ साजरा, दूरदर्शी व्यक्तींना मिळाला सन्मान
3

झी झेस्ट अनलिमिट अवॉर्ड्स 2026: फूड आणि लाइफस्टाइल क्षेत्रातील ‘रीडिफायनिंग एक्सीलेंस’ साजरा, दूरदर्शी व्यक्तींना मिळाला सन्मान

नोरा फतेहीचा वर्क परमिट रद्द होणार? भारतातून डिपोर्ट होण्याची शक्यता; 10 वकीलांची टीम मंत्रालयात पोहोचली
4

नोरा फतेहीचा वर्क परमिट रद्द होणार? भारतातून डिपोर्ट होण्याची शक्यता; 10 वकीलांची टीम मंत्रालयात पोहोचली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.