Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुष्कर जोगचा ‘ह्युमन कोकेन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस, वास्तव कल्पनेपेक्षा मिळणार थरारक अनुभव

मराठी अभिनेता पुष्कर जोगचा लवकरच आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे हटके नाव नुकतंच प्रदर्शित झालं असून, चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर देखील शेअर केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 27, 2025 | 04:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • पुष्कर जोगचा ‘ह्युमन कोकेन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
  • पुष्कर जोगचे हिंदीत पदार्पण
  • ‘ह्युमन कोकेन’ चित्रपटाची स्टारकास्ट
मराठी अभिनेता पुष्कर जोग आता मराठी चित्रपटामध्ये यशमिळवल्यानंतर आता हिंदी चित्रपटामध्ये लवकरच पदार्पण करत आहे. अभिनेत्याने नुकतीच त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर देखील रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील निर्मात्यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पुष्कर जोगच्या चित्रपटाचं नाव फारच वेगळं आहे. ‘ह्युमन कोकेन’ असे या चित्रपटाचे नाव असून, या नावेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ह्युमन कोकेन’ हा एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर असून तो प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि ड्रग कार्टेलच्या काळोख्या जगात घेऊन जाणार आहे.

तान्याने केली शिवीगाळ तर, नीलमने दिली धमकी; ‘बिग बॉस १९’ मध्ये संपूर्ण घर अभिषेक आणि अशनूरच्या का गेले विरोधात?

या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर जोग पुन्हा एकदा एका प्रभावी आणि आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा आणि ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सिझनमधील लोकप्रिय रनर-अप म्हणून ओळख मिळवल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. तसेच अभिनेत्याच्या ‘व्हिक्टोरिया – एक रहस्य’ चित्रपटाच्या यशानंतर, आता पूर्णपणे वेगळ्या आणि संवेदनशील विषयावर आधारित सिनेमात झळकणार आहे.

या चित्रपटाबद्दल सांगताना पुष्कर म्हणाला, ”’ह्युमन कोकेन’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक चित्रपट आहे. या पात्रात शिरण्यासाठी मी मानसिक आणि शारीरिक तयारीसोबत बऱ्याच कार्यशाळा केल्या. एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचा अंतर्गत संघर्ष समजून घेणं अजिबात सोपं नव्हतं.” असे तो म्हणाला.

Vadh 2 : संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या ‘वध २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; जाणून कधी होणार प्रदर्शित?

‘ह्युमन कोकेन’ या चित्रपटात इशिता राज, सिद्धांत कपूर, जाकीर हुसेन आणि काही ब्रिटिश कलाकारांची तगडी स्टारकास्ट असून चित्रपटाला एक आंतरराष्ट्रीय लुक प्राप्त झाला आहे. सरीम मोमिन लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती स्कार्लेट स्लेट स्टुडिओज, वाइनलाइट लिमिटेड, आणि टेक्स्टस्टेप सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी गूजबंप्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने केली आहे. ची तेंग जू आणि हरीत देसाई ‘ह्युमन कोकेन’ चे निर्माते असून छायाचित्रण सोपन पुरंदरे, संपादन संदीप फ्रान्सिस, संगीत क्षितिज तारे, तर नृत्यदिग्दर्शन पवन शेट्टी आणि खालिद शेख यांनी केले आहे. युनायटेड किंगडममध्ये चित्रीत झालेला ‘ह्युमन कोकेन’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच १६ जानेवारी २०२६ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pushkar jog hindi film human cocaine posters released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • entertainment
  • Hindi Movie
  • pushkar jog

संबंधित बातम्या

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ
1

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
2

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा
3

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
4

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.