Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजा शिवाजी’ टीझरला प्रेक्षकांची पसंती; Riteish Deshmukh चा शिवराय अवतार पाहून प्रेक्षक भावूक

‘धुरंधर २’ हा चित्रपट सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. अशातच ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझर थिएटरमध्ये झळकत आहे. आणि त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 02:26 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • ‘राजा शिवाजी’ टीझरला प्रेक्षकांची पसंती
  • रितेशचा शिवराय अवतार पाहून प्रेक्षक भावूक
  • ‘राजा शिवाजी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा भव्य टीझर नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सणाचा दिवस असूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे ‘धुरंधर द रिव्हेंज’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना ‘राजा शिवाजी’च्या टीझरची खास झलक अनुभवायला मिळाली आणि थिएटरमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत ‘स्वामी गुरुमाऊली’ गाणं प्रदर्शित; अभिनेता सनी कांबळेचं दिग्दर्शनात पदार्पण

टीझर सुरू होताच प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषाचा आवाज घुमू लागला. स्वराज्याच्या प्रेरणादायी गाथेची ही पहिली झलक अनेकांना भावूक करून गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य चित्रपटाची झलक पाहून प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एवढंच नाही, तर अनेकांनी थिएटरमध्येच टीझरचे व्हिडिओ कॅप्चर करून ते सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्राम रीलवर शेअर केले. त्यामुळे या टीझरची चर्चा आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात रंगताना दिसत आहे.

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार असून, त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या या दुहेरी भूमिकेमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनेलिया देशमुख यांनी केली आहे. तसेच जिनेलिया देशमुख देखील या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

‘माझ्या लग्नात मला बोलावलंच नाही…’, भाऊ कदमच्या व्हायरल पोस्टवर लेकीची प्रतिक्रिया; मीडियावर साधला निशाणा

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूचीही तितकीच चर्चा आहे. संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेलं दमदार संगीत आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवन यांचं नेत्रदीपक छायांकन या चित्रपटाला भव्यतेची उंची देणार आहे. टीझरला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वराज्याची प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. राजा शिवाजी हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, तो बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Raja shivaji teaser with dhurandhar social media buzz response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?
1

Ethanol Stove : महागड्या LPG सिलिंडरपासून होणार सुटका? एथेनॉलने स्वयंपाक करणं शक्य? सरकारची काय आहे योजना?

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
2

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
3

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.