Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये,’ टॅगलाईनसह ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित; रिंकूची लक्षवेधी भूमिका!

रिंकू राजगुरूचा नुकताच चर्चेत असलेला नवाकोरा आगामी चित्रपट ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. कारण रिंकू या चित्रपटामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 05, 2025 | 01:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘आशा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
  • रिंकूने साकारली आहे लक्षवेधी भूमिका
  • ‘आशा’ चित्रपट आता कधी होणार प्रदर्शित?
 

काही दिवसांपूर्वी ‘आशा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. त्यात रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा सेविका सायकलवर बसून गावागावांतील लोकांपर्यंत पोहोचते, अशी काही झलक दाखवण्यात आली होती. या साध्या तरीही परिणामकारक दृश्यांनीच प्रेक्षकांच्या मनात आशाच्या प्रवासाबद्दल एक वेगळं कुतूहल निर्माण केले आहे. चित्रपटाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आशाच्या जिद्दीची आणि धैर्याची स्तुती केली आहे आणि आता प्रदर्शित झालेला दमदार ट्रेलर ही उत्सुकता आणखीनच वाढवणारा ठरत आहे.

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटात अभिनेत्याची लक्षवेधी भूमिका!

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॅा. ओमप्रकाश शेटे, ज्येष्ठ साहित्यिक आणि ९९व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगलप्रभात लोढा आदी मान्यवरांसह ‘आशा’ चा ट्रेलर लाँच सोहळा यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसत आहे. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणे, कुटुंबातील ताणतणावांना सामोरे जाणे, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहणं आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्याची धडपड हे सगळे ट्रेलरमध्ये दिसून आले आहे. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ ट्रेलरमध्ये स्पष्टपणे जाणव आहे.

मालती चहर घरा बाहेर पडताच प्रणित मोरेला अश्रू अनावर; Bigg Boss 19 ला मिळाले 5 Finalist

रिंकूसह सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सगळ्यांचा प्रभावी संगम चित्रपटात दिसणार आहे. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची गोष्ट आहे, हेच चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य दाखवण्यात आले आहे.

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथानक आणि वास्तववादी मांडणी घेऊन भेटीला येत आहे. ‘आशा’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Rinku rajguru aasha upcoming marathi movie official trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 15 च्या प्रीमियरबाबत समोर आली मोठी अपडेट, कोण कोणते स्पर्धक होणार सामील?
1

Khatron Ke Khiladi 15 च्या प्रीमियरबाबत समोर आली मोठी अपडेट, कोण कोणते स्पर्धक होणार सामील?

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई
2

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
3

‘कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता…’, अखेर एआर रहमान यांनी ‘जातीयवाद’ टिप्पणीवर दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत
4

‘चित्रपटइंडस्ट्री एकजूट नाहीत…’, इमरान हाश्मीने बॉलीवूडबद्दल केला मोठा खुलासा; ट्रोलिंगवरही मांडले मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.