Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला! साऊथ अभिनेता फहाद फासीलने टीमला दिल्या शुभेच्छा

'शंकर जयकिशन’ हे आगामी नाटकाची चर्चा सध्या सावत्र सुरु आहे. तसेच रंगभूमीवर हे नाटक लवकरच येणार असून, या नाटकाला अभिनेता फहाद फासीलने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 07, 2025 | 02:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला
  • साऊथ अभिनेत्याने नाटकाच्या टीमला दिल्या शुभेच्छा
  • ‘शंकर जयकिशन’ कधी येणार रंगभूमीवर?
 

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाच्या तालमीबद्दल एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. साधारणत: नाटकांच्या तालमी या मुंबई–पुण्यात किंवा कलाकारांच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रातच होतात. परंतु या नाटकाची तालीम थेट हैदराबादला होत आहे. हे ऐकून नाटकप्रेमींसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. होय, या नाटकाचे कलाकार थेट हैदराबादमध्ये तालमीसाठी पोहचले आहेत. आणि त्यांची तालीम करत आहेत.

या अनोख्या निर्णयामागे कारणही तितकेच विशेष आहे. नाटकातील मुख्य भूमिका साकारत असलेले महेश मांजरेकर सध्या एका महत्त्वाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाची तालीम या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना नाटकावर परिणाम व्हायला नको, या विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. महेश मांजरेकर यांनी या संदर्भात नाटकाचे अभिनेते आणि निर्माते भरत जाधव यांच्याशी चर्चा केली. नाटकाची गुणवत्ता अबाधित राहावी, तालीम सुरळीत व्हावी यासाठी भरत जाधव यांनी तात्काळ तयारी दाखवत, संपूर्ण टीमसह हैदराबादला तालीम करण्यास होण्यास होकार दिला.

आईच्या निखळ प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘उत्तर’मधील ‘असेन मी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीस!

त्यामुळे आता नाटकाची टीम काही दिवसांपासून हैदराबादमध्येच मुक्काम करत आहे आणि तिथे अगदी जोरदार आणि शिस्तबद्ध तालीम सुरू असून ही तालीम सेटवर आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये अशी दोन्ही ठिकाणी होत आहे. वैशिष्ट्य म्हणजे मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता फहाद फासील याने तालमीदरम्यान टीमला भेटून गप्पा मारत नाटकाला शुभेच्छा दिल्या. एका नाटकासाठी इतक्या प्रमाणात केलेला हा लॉजिस्टिक प्रयत्न मराठी रंगभूमीत क्वचितच पाहायला मिळतो.

महेश मांजरेकर सध्या अक्षरशः डबलशिफ्ट मध्ये काम करत असून दिवसा दाक्षिणात्य चित्रपटाचे शूटिंग आणि संध्याकाळपासून ‘शंकर जयकिशन’ नाटकाची तालीम चालू आहे. त्यांच्या काम करण्याच्या वेगाने आणि समर्पणाने संपूर्ण टीमलाच नवसंजीवनी मिळाली आहे. नाटकासाठी ते दाखवत असलेलं प्रेम खरोखरच उल्लेखनीय आहे. एका मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले होते “नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे.” आज हैदराबादमध्ये चालू असलेल्या या तालमींमुळे तो शब्द त्यांनी कृतीतून सिद्ध केला आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चा; अफगानिस्तानी क्रिकेटरसोबत करणार लग्न?

त्यांचे डेडिकेशन पाहून तिथे उपस्थित टीमलादेखील प्रचंड प्रेरणा मिळत असल्याचं दिसत आहे. भरत जाधव यांच्यासह संपूर्ण तांत्रिक आणि कलात्मक मंडळींच्या सहकार्यामुळे नाटक अधिक दमदार व्हावं, यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करत आहेत. तालीम हैदराबादला हलवण्याचा हा निर्णय नाटकाविषयी टीमचा असलेला जिव्हाळा आणि व्यावसायिकता दाखवतो. मराठी नाटकांमध्ये आजवर क्वचितच पाहिल्या गेलेल्या अशा पद्धतीच्या तालमींमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी यांनी केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत आणि अजित परब यांचे संगीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: South star fahad fasil promoted and congratulated shankar jaykishan natak team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • entertainment
  • mahesh manjrekar

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : विशालने प्रभूला दाखवला शब्दांचा फरक! विशालच्या नव्या अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मन
1

Bigg Boss Marathi 6 : विशालने प्रभूला दाखवला शब्दांचा फरक! विशालच्या नव्या अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मन

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस!
2

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस!

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित
3

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

Oscars 2026 Nomination: ९८ व्या अकादमी पुरस्कारांची आज घोषणा; जाणून घ्या कोणता भारतीय चित्रपट शर्यतीत?
4

Oscars 2026 Nomination: ९८ व्या अकादमी पुरस्कारांची आज घोषणा; जाणून घ्या कोणता भारतीय चित्रपट शर्यतीत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.