(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बिग बॉस ११ फेम अर्शी खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आफताब आलमला डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. टेलीचक्करच्या अलिकडच्या वृत्तानुसार, हे जोडपे लवकरच लग्न करणार आहे.
अर्शी खान आणि आलम बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. पोर्टलच्या जवळच्या एका सूत्राने दावा केला आहे की अर्शी आणि आफताब बऱ्याच काळापासून डेट करत आहेत.जर सर्व काही ठीक राहिले तर ते फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अर्शीचे नाव पूर्वी डान्सर ईशान मसीहशी जोडले गेले होते आणि त्याआधी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीशी तिचे नाव जोडले गेले होते.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की अर्शी किंवा आफताब दोघांनीही यांनी अधिकृत माहिती दिली नाहीये. अर्शी खान अनेकदा ईशान मसिहसोबतच्या तिच्या व्हिडिओंद्वारे लक्ष वेधून घेते.२०२२ मध्ये बिग बॉस फेमने स्पष्ट केले की ती मसिहसोबत प्रेमसंबंधात गुंतलेली नाही. त्याऐवजी, ती एका व्यावसायिकाला डेट करत होती.
अर्शीने ई-टाईम्सला सांगितले की, “तो माझ्या इंडस्ट्रीचा भाग नाही. तो एक बिझनेसमन आहे. मी आमचे नाते सार्वजनिक करू इच्छित नाही. ते माझे वैयक्तिक आयुष्य आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर, मी ठरवले की मी माझे नाते आणि वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवेन, अन्यथा मी स्वतःला चौकशीच्या कक्षेत आणेन आणि प्रत्येक गोष्टीसाठी माझा न्याय केला जाईल.”
२,५०,८९९ मतांनी आघाडीवर असलेला ‘हा’ स्पर्धक होणार विजेता? गौरव आणि फरहानाला मिळणार ठेंगा
अर्शी खान ही एक भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि रिअॅलिटी टीव्ही व्यक्तिमत्व आहे जी बिग बॉस ११ या रिअॅलिटी शोमध्ये दिसल्यानंतर प्रसिद्धी मिळवली. अफगाण पठाण वंशाच्या कुटुंबात जन्मलेली अर्शी तिचे मूळ अफगाणिस्तानमध्ये आहे. ती कधीही अफगाणिस्तानात राहिली नाही. ती भोपाळमध्ये वाढली आणि भारतीय नागरिक आहे.






