Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा फॅमिली एंटरटेनर चित्रपट

‘सुपर डुपर’ हा मराठी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 09, 2026 | 12:08 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला
  • तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा कौटुंबिक चित्रपट
  • ‘सुपर डुपर’ ठरली प्रेक्षकांची पहिली पसंत
 

सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘सुपर डुपर’ या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दमदार कथानक, कलाकारांची प्रभावी कामगिरी आणि मनाला भिडणारी मांडणी यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूडमधील मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘सुपर डुपर’ने आपली वेगळी छाप निर्माण केली असून, प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्राधान्य दिले आहे. हीच बाब त्याच्या यशाची खरी पावती ठरत आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरत आहेत. “आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो, पण ‘सुपर डुपर’ हा असा चित्रपट आहे जो तिन्ही पिढ्या एकत्र बसून आनंदाने पाहू शकतात,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जोडणारा, हसवणारा आणि तितकाच भावूक करणारा हा चित्रपट असल्यामुळे चित्रपटगृहांमध्ये कौटुंबिक प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

साई पल्लवी-जुनैद खानच्या ‘एक दिन’ची खास गोष्ट; निर्माता म्हणून मन्सूर खानने साकारली अनोखी भूमिका

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची सार्वत्रिक अपील. फक्त मराठीच नव्हे, तर अमराठी प्रेक्षकांनाही ‘सुपर डुपर’ आकर्षित करत आहे. भाषेच्या पलीकडे जाऊन या चित्रपटाची कथा प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि संगीत यामुळे प्रेक्षकांचा अनुभव अधिक समृद्ध होत असल्याचेही अनेकांनी नमूद केले आहे.

या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, “प्रेक्षकांनी इतक्या प्रेमाने चित्रपट स्वीकारला, ही आमच्यासाठी अतिशय समाधान देणारी गोष्ट आहे. आम्ही असा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला जो कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भावेल, त्यांना एकत्र आणेल आणि हसवतानाच भावूकही करेल. प्रेक्षकांना थिएटरमध्ये एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेताना पाहणे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणे यापेक्षा मोठे यश आमच्यासाठी काहीच नाही.”

तर भावेश जानवलेकर यांनीही चित्रपटाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “’सुपर डुपर’ला मिळणारा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक सहकुटुंब चित्रपटगृहात येत आहेत, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी आशादायी चित्र आहे. बऱ्याच दिवसांनी खऱ्या अर्थाने एक फॅमिली फिल्म आली असून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे.”

Dhurandhar 2 Collection: रणवीर सिंगच्या चित्रपटाची धडाकेबाज कामगिरी; चित्रपटाने गाठला कोटींचा टप्पा

झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ या चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, शशांक शेंडे, हृषीकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून, निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे आहेत. तसेच उमेश कुमार बन्सल आणि भावेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ता आहेत. छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे.

एकूणच, हास्य, भावना आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा सुंदर संगम असलेला ‘सुपर डुपर’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कुटुंबासोबत पाहण्यासारखा दर्जेदार मनोरंजन देणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा यशस्वी टप्पा ठरत आहे.

Web Title: Super duper marathi film public review family audience response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत
1

बदलत्या नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात! प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
2

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
3

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
4

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.