
Sai Tamhankar and Lalit Prabhakar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांनी यापूर्वी ‘मीडियम स्पायसी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांच्या अभिनयाला आणि पडद्यावरील सहज वावराला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
आता समोर आलेल्या फोटोमुळे या चर्चेला आणखी जोर मिळाला आहे. सईचा पारंपरिक लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली असून, नाकात नथ, गळ्यात मोत्यांचा हार आणि कपाळावर मोठे कुंकू लावले आहे. तिचा हा मराठमोळा अंदाज पाहून चाहत्यांना जुन्या काळातील मराठी स्त्रीची आठवण येत आहे.
दुसरीकडे, ललित प्रभाकरनेही वेगळी वेशभूषा केली आहे. अंगात तपकिरी रंगाचा झब्बा आणि डोक्यावर लाल रंगाचा फेटा अशा रूपात तो दिसत आहे. त्याचा हा साधा आकर्षक लूक पाहून हा कोणता ऐतिहासिक सिनेमा असणार असा, अंदाज लावला आहे.
या फोटोमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा एखाद्या चित्रपटासाठी केलेला फोटोशूट आहे की नव्या प्रोजेक्टची तयारी, याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही चाहत्यांना ही जोडी एखाद्या जुन्या काळातील प्रेमकथेत पाहायला आवडेल, तर काही जण नवीन मराठी चित्रपटाची अपेक्षा करत आहेत. सई किंवा ललित यांच्याकडून या फोटोबाबत अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. कोणतीही भूमिका सई तिच्या विशेष शैलीमुळे सहज सादर करते. नुकताच आलेल्या अडकित्ता या चित्रपटामध्ये सोपा एवढीच महत्त्वाची भूमिका साकरत होती. मोठ-मोठ्या कलाकारांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले. मराठी सिनेसृष्टीबरोबरच तिने बॉलिवूडमध्ये तिने आपली छाप सोडली आहे.
ललित प्रभाकर यानेही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील आदित्य घराघरात जाऊन पोहचला. ललितचा निरागस अभिनय हा तरुणाईला अधिकच भावतो. या दोघांची खासियत म्हणजे ते प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतात. चाहते अशा दोन दमदार जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहे.
सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या या फोटोमुळे मराठी मनोरंजनविश्वात उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या नव्या प्रोजेक्टबद्दल प्रश्न विचारत आहेत. काही जणांनी या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आता हा फोटो केवळ एखाद्या खास शूटचा भाग आहे की त्यामागे खरोखरच नवीन चित्रपटाची गोष्ट दडली आहे, हे येणाऱ्या काळातच समजेल. तोपर्यंत सईचा नऊवारीतील सुंदर अंदाज आणि ललितचा पारंपरिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत राहणार, हे मात्र नक्की.