Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

ढोल-ताशांचा गजर, लग्नघरातील उत्साह, धमाल मस्तीत अभि आणि क्रितिका म्हणजेच अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 10, 2026 | 05:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लग्न म्हणजे आनंद, गोंधळ, परंपरा आणि थोडीशी धावपळ… परंतु या सगळ्यावर जर अचानक ‘शॉट’ बसला तर? हाच प्रश्न उद्भवणाऱ्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, लग्नघरातील उत्साह, धमाल आणि पारंपरिक विधींनी नटलेल्या या सोहळ्यात चित्रपटातील नवरा -नवरी अर्थात अभि आणि क्रितिका म्हणजेच अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी उखाणेही घेतले. या रंगतदार सोहळ्यात भर टाकली ती, चित्रपटाच्या टीझरने. ‘लग्नाचा शॉट’ची पहिलीच झलक उपस्थितांना प्रचंड भावल्याचे दिसत आहे.

पोस्टरमधून सूचित झालेल्या गोंधळाचा टिझरमध्ये मजेशीर विस्तार पाहायला मिळतो. लग्नाची धावपळ, चुकीचे निर्णय, वेळेचा गोंधळ, नशिबाचे फेरे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार प्रसंगांची झलक टिझरमध्ये दिसते. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच टिझरमध्येही ‘शॉट’ म्हणजेच अचानक घडणाऱ्या घटना, वळणावळणाचा प्रवास आणि लग्नात उडणारा गोंधळ यांचा धमाल मेळ आहे.

विशेष म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांची केमिस्ट्री टिझरमध्ये खूपच फ्रेश आणि सहज वाटते. त्यांच्या संवादांमधील टायमिंग, हावभाव आणि एकमेकांशी असलेली जुगलबंदी पाहाता ही जोडी प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहाणार आहे. टिझरमधून हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहाता येईल, असा स्वच्छ, हलकाफुलका आणि मनोरंजक अनुभव देणारा असल्याचं स्पष्ट होतंय.

 

चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, ” ‘लग्नाचा शॉट’ हा लग्नाकडे केवळ समारंभ म्हणून न पाहाता, त्यातील गोंधळ, भावना आणि विनोद यांचं मजेशीर चित्रण करणारा चित्रपट आहे. अभिजीत आणि प्रियदर्शिनी यांची केमिस्ट्री खूप नैसर्गिक आहे आणि त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतला आहे. कोणताही उपदेश न करता, प्रेक्षकांनी दोन तास मनसोक्त हसावं, एन्जॉय करावं आणि आपल्या लग्नघरातील आठवणींशी जोडून घ्यावं, एवढाच आमचा प्रयत्न आहे. हा चित्रपट म्हणजे स्वच्छ, प्रामाणिक आणि कौटुंबिक मनोरंजनाचा शॉट आहे.”

O Romeo Teaser: हातात गजरा, कानात बाळी; मासी-क्लासी लूकमध्ये दिसला रोमियो, टीझर बघून विसरून जाल कबीर सिंग

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

Web Title: Teaser of lagnacha shot released priyadarshini and abhijeets new film to hit theaters on 6th february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई
1

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई

महायुद्धाची नांदी सुरू! भुलोकाचे रक्षण, महिषासुराचा अंत, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा अध्याय
2

महायुद्धाची नांदी सुरू! भुलोकाचे रक्षण, महिषासुराचा अंत, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा अध्याय

”तेव्हाच त्या आत्म्याला घरात..”, ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये रहस्यमय वळण; गूढ घटनांनी वाढणार रहस्य
3

”तेव्हाच त्या आत्म्याला घरात..”, ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये रहस्यमय वळण; गूढ घटनांनी वाढणार रहस्य

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार
4

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.