Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, आई मुलाच्या नात्याची उलगडणार गोष्ट

मराठी चित्रपटाचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता अशातच आणखी एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित 'उत्तर' चित्रपटाचे टीझर लाँच झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 03, 2025 | 02:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
  • आई मुलाच्या नात्याची उलगडणार नवी गोष्ट
  • ‘उत्तर’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित

प्रत्येक जन्माला आलेल्या बाळाचं घट्ट नातं जुळत ते म्हणजे स्वतःच्या आईशी. बाळाच्या जन्मानंतर रूढार्थानं त्याची आईसोबतची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ तिच्यासोबत आयुष्यभर जुळलेली असते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबरची साथ कधी सोडत नाही, तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं. अशीच आई आणि मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, ज्याचे नाव आहे ‘उत्तर.’

Tejaswini Lonariचा पारंपरिक अंदाज! आईच्या आवडीचे दागिने आणि मराठमोळा साज ठरला चर्चेचा विषय, साखरपुड्याचा लूक पाहा

झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहे. आणि पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘उत्तर’ या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात गुणी आणि चोखंदळ अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत दिसणार आहे आहे तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहे. ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घराची, नि घरातल्या प्रत्येक मुलांची, तरीही आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी गोष्ट नेमकी आहे तरी काय? याचं ‘उत्तर’ रसिकांना येत्या १२ डिसेंबरला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

 

तंत्रज्ञानाच्या या युगात संवादाची साधने जरी वाढली असली तरी माणसांचा आपआपसांतील संवाद कमी होत असल्याची चिंता आपण सतत व्यक्त करतो. ‘उत्तर’च्या टीझरमध्येही अशाच प्रकारचा आई मुलामधला संवाद बघायला मिळणार आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलासोबत आईचा फोनवरील खुमासदार संवाद यात ऐकायला मिळतो. ज्यात आईच्या काळजीच्या प्रश्नांना कंटाळलेला मुलगा फोन ठेवू का ? असं विचारतो त्यावर “इनकमिंगला पैसे पडल्यासारखा बोलतोस” अशी आईची प्रतिक्रिया पण दिसते. थोडक्यात, फास्ट फुड, फास्ट वाय फाय, सगळं काही इन्स्टंट, रेडिमेड हवं, असा विचार करणाऱ्या आजच्या पिढीला थोडा ठहराव देणाऱ्या आईची ही गोष्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर खूप सुंदर आहे.

‘भूल भुलैया ४’ मध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन दिसणार एकत्र? अनीस बज्मीने चित्रपटाबद्दल दिल्या अपडेट

झी स्टुडिओजसोबत आजवर ‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’, ‘धुरळा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचं लेखन करणाऱ्या शिवाय हिंदीमध्येही ‘सिंघम २’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं आणि ‘ताली’सारख्या संवदेनशील वेबसिरीजचं लेखन करणाऱ्या क्षितिज पटवर्धनने या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे ही विशेष बाब आहे.

‘उत्तर’ या चित्रपटाबद्दल बोलताना क्षितिज पटवर्धनने म्हणाले की, ” ‘आई’ हे सगळ्यात गृहीत धरलेलं नातं आहे ज्यामुळे सगळ्या जवळच्या नात्याकडे दुर्लक्ष होते. आईचा फक्त ‘व्यक्ती’ म्हणून विचार करायला भाग पडणारी आणि ‘आई आणि मूल’ या नात्याचा नव्याने विचार करायला लावणारी कलाकृती ‘उत्तर’ या चित्रपटामधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.” असे ते म्हणाले. येत्या १२ डिसेंबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Teaser of the film uttar directed by kshitij patwardhan released the story of the mother son relationship will unfold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • Marathi News

संबंधित बातम्या

Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक
1

Satara News : निवडणूकीचं बिगुल वाजणार; सातारकरांना हवाय काम करणारा नगरसेवक

“चलो बुलावा आया है, ट्रंप ने बुलाया है…”, गॅरी संधूने केला देवीचा अपमान; शिवसेनेच्या रडारवर आला गायक
2

“चलो बुलावा आया है, ट्रंप ने बुलाया है…”, गॅरी संधूने केला देवीचा अपमान; शिवसेनेच्या रडारवर आला गायक

‘आज माझ्या बहिणींनी इतिहास रचला…’ महिला क्रिकेट संघाचे सेलिब्रिटींनी केले अभिनंदन; सर्वत्र विजयाचा जल्लोष
3

‘आज माझ्या बहिणींनी इतिहास रचला…’ महिला क्रिकेट संघाचे सेलिब्रिटींनी केले अभिनंदन; सर्वत्र विजयाचा जल्लोष

‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा
4

‘आम्ही दोघी’ नंतर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र; ‘असंभव’मधून रंगणार रहस्यमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.