‘ठरलं तर मग’ मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रिया आणि साक्षीचा गुन्हा सिद्ध करुन अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष मुक्त केलं. साक्षी आणि प्रिया नावाचं वादळ सुभेदार कुटुंबातून निघून गेलं असलं तरी आता पुन्हा एकदा नव्या संकटाची चाहूल लागली आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये सुभेदार कुटुंबावर येणाऱ्या संकटाची चाहूल लागली आहे.
साक्षी आणि प्रिया यांना शिक्षा झाल्यानंतर आता नवं संकट सुभेदारांच्या घरावर येत आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळतं की, खिडकीची काच तोडून सायली अर्जुनच्या बेडरुममध्ये एक दगड येतो. हा दगड कागदात गुंडाळेला असतो. त्या कागदावर असं असं लिहिलेलं असतं की, अर्जुन आता वेळ आली आहे तुझा जीव घेण्याची… अशी धमकी या कागदावर लिहिलेली असते. हा धमकीचा कागद सायली वाचते. अर्जुन जेव्हा ऑफिसला जायला निघतो तेव्हा सायली तिच्या पदराने अर्जुनचे हात बांधते. सायली अर्जुनला म्हणते की,आता जिथे जिथे तुम्ही असणार तिथे मी असेन , मी तुम्हाला एकटं कुठेही सोडणार नाही. तुम्ही वकील नंतर आधी माझे अहो आहात..
सायलीचा हा हटके अंदाज मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. मालिकेतील हा भाग 6 आणि 7 तारखेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्जुनला वाचवण्याचा सायलीचा गोड प्रयत्न असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.मालिका विश्वात सध्या ठरवं तर मग मालिका चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नव्या प्रोमोमुळे मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ही धमकी नेमकी दिली तरी कोणी? यामागे महिपत शिखरे आहे की आणखी कोणी, हे नवं संकट सुभेदारा कुटुंबाला पेलणार का ? सायली आणि अर्जुन यातून कसे बाहेर पडणार याबाबत आता मलिकेच्या नव्या भागात कळणार आहे.