Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर

तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 19, 2025 | 08:13 PM
गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर
Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा संगम असणारे सिनेमे सध्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशातच आता गाडी नंबर 1760 या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर 1760 ’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे 4जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्टं एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.”

निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, ” तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर 1760 ’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.”

तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन योगीराज संजय गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

Web Title: The explosive trailer of train no 1760 is out a unique journey filled with humor and suspense

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • latest news
  • marathi movie
  • Upcoming Movies

संबंधित बातम्या

”महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला..”, रितेशने रूचिता जामदारला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर तन्वी पाठोपाठ रूचिताची घेतली शाळा
1

”महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला..”, रितेशने रूचिता जामदारला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर तन्वी पाठोपाठ रूचिताची घेतली शाळा

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित
2

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”
3

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा
4

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.