Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोंधळ’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप! गोव्यामधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मिळवले स्थान

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. ‘इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन’ मध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 08, 2025 | 06:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. गोवा येथे होणाऱ्या भारतीय सरकारच्या ५६ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (IFFI) ‘इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन’ मध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. त्यामुळे ‘गोंधळ’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिकच वाढली आहे.

या फेस्टिव्हलमध्ये ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘गोंधळ’ या चित्रपटाची अधिकृत निवड झाली असून या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. मात्र ‘गोंधळ’ने एक पाऊल टाकत ‘इंडियन पॅमोरमा गोल्डन पिकॅाक अवॅार्ड’ विभागात स्थान पटकावले आहे. ‘सेलिब्रेट द जॉय ऑफ सिनेमा’ या घोषवाक्याने साजरा होणाऱ्या या प्रतिष्ठित महोत्सवात ‘गोंधळ’ची निवड होणे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या परंपरा, लोककला आणि श्रद्धांचा अनोखा संगम दाखवतो. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक ‘गोंधळ’ विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा केवळ धार्मिक विधीवर मर्यादित न राहाता मानवी भावना, अंधश्रद्धा, आणि समाजातील बदलणारे दृष्टिकोन यांचाही वेध घेतो. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टतेसह ‘गोंधळ’ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर मांडतो. आता ‘गोंधळ’चा प्रवास स्थानिक पातळीवरून थेट आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचला आहे.

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, “आमच्या टीमसाठी ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ‘गोंधळ’ हा आपल्या मातीतला, श्रद्धा आणि परंपरांशी जोडलेला सिनेमा आहे आणि त्याची निवड भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजिलेल्या इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणे म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा सन्मान आहे. आमच्या कलेला जागतिक पातळीवर ओळख मिळत आहे, यापेक्षा मोठं बक्षीस काही असूच शकत नाही.”

New Marathi Movie :जिद्द, सेवा आणि संघर्षाची कथा सांगणारा ‘ताठ कणा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्माती दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘गोंधळ’ हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रथमेश परब-पॅडी कांबळेच्या ‘हुक्की’चा फर्स्ट लुक प्रदर्शित; Varun Dhawanने शेअर केले पोस्टर

Web Title: The film gondhal has been officially selected in the indian panorama golden peacock section of the international film festival of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

New Marathi Movie :जिद्द, सेवा आणि संघर्षाची कथा सांगणारा ‘ताठ कणा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

New Marathi Movie :जिद्द, सेवा आणि संघर्षाची कथा सांगणारा ‘ताठ कणा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

प्रथमेश परब-पॅडी कांबळेच्या ‘हुक्की’चा फर्स्ट लुक प्रदर्शित; Varun Dhawanने शेअर केले पोस्टर
2

प्रथमेश परब-पॅडी कांबळेच्या ‘हुक्की’चा फर्स्ट लुक प्रदर्शित; Varun Dhawanने शेअर केले पोस्टर

“तेरा करियर बिगाड़ दूंगा”… अमिताभ बच्चन यांनी शंकर महादेवन यांना दिली धमकी, ‘कजरा रे’शी संबंधित 20 वर्ष जुना किस्सा
3

“तेरा करियर बिगाड़ दूंगा”… अमिताभ बच्चन यांनी शंकर महादेवन यांना दिली धमकी, ‘कजरा रे’शी संबंधित 20 वर्ष जुना किस्सा

Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण
4

Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.