Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Serial Update: ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर स्टार प्रवाहची ‘ही’ मालिका होणार बंद; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिका तब्बल ४ वर्षे आणि १४०० भागांचा प्रवास पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मुख्य अभिनेत्रीच्या भावूक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 24, 2026 | 11:05 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजन विश्वात सध्या मालिकांच्या बदलत्या वेळापत्रकाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांत तब्बल ८ नवीन मालिका आणि शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहिनीवरील काही जुन्या आणि लोकप्रिय मालिकांना निरोप द्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता ‘मुरांबा’ ही लोकप्रिय मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तब्बल ४ वर्षे आणि जवळपास १४०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानंतर ही मालिका ऑफ एअर होणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

14 फेब्रुवारी 2022 रोजी मुरांबा या मालिकेचा पहिला भाग स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झाला होता. या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेत या दोघांनी रमा आणि अक्षय हे पात्र साकारले होते. नुकतेच या मालिकेचे 1400 भाग पूर्ण झाले. चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेचा प्रवास आता शेवटाकडे येऊन पोहोचला आहे. सर्वांची लाडकी मुरांबा मालिका लवकरच निरोप घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेत्री शिवानी मुंढेकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने one last time.. रमा म्हणून काही शेवटचे क्षण असं कॅप्शन लिहिले आहे. यावरून मुरांबा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर

विशेष म्हणजे, ‘मुरांबा’ ही मालिका पहिल्या दिवसापासून ‘प्रवाह दुपार’ या सत्रात प्रसारित केली जात होती. दुपारच्या स्लॉटमध्ये सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळवत ही मालिका त्या सत्रातील सर्वाधिक यशस्वी मालिका ठरली. कथानकातील भावनिक वळणं, कौटुंबिक नातेसंबंध आणि कलाकारांच्या अभिनयामुळे मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Vithabai Narayangaonkar Real Story: प्रसूतीनंतर लगेच रंगमंच गाजवणाऱ्या विठाबाई नेमक्या कोण होत्या? वाचा सविस्तर

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची वेळ बदलल्यानंतर सध्या ‘मुरांबा’ दुपारी ३ वाजता प्रसारित होत आहे. मात्र, आता या मालिकेचा प्रवास लवकरच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने सोशल मीडियावर “One Last…” अशी पोस्ट शेअर केल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे. अशातच ‘मुरांबा’च्या शेवटाची बातमी चाहत्यांसाठी भावनिक ठरत असून, मालिकेचा अंतिम भाग कधी प्रसारित होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Web Title: After 4 years muramba to go off air lead actress emotional post creates buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial update
  • star pravah

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.