Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ मधील पहिलं शीर्षक गीत प्रदर्शित

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा मराठी चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये सासू-सुनेची जुलगबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशातच या चित्रपटातील पहिलं गाणं देखील रिलीज झाले

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 22, 2025 | 03:18 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सासू-सुनेची पाहायला मिळणार खट्याळ जुगलबंदी
  • ‘अगं अगं सूनबाई…’ मधील पहिलं शीर्षक गीत प्रदर्शित
  • ‘अगं अगं सूनबाई…’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोक झोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. तसेच प्रेक्षकांचे या चित्रपटामुळे भरपूर मनोरंजन होणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना अनेक विनोद आणि मजा मस्ती पाहायला मिळणार आहे.

Drishyam 3 Release Date: विजय साळगावतर परत येतोय, Ajay Devgnच्या ‘दृश्यम ३’ ची घोषणा; पाहा पहिली झलक

हे शीर्षक गीत म्हणजे सासू-सुनेच्या रोजच्या नात्यातील गंमतीदार प्रसंगांचे संगीतमय रूप आहे. घराघरांत घडणाऱ्या मिश्किल टोमण्यांपासून खट्याळ तक्रारींपर्यंत आणि त्या मागील आपुलकीपर्यंत सगळ्या भावना या गाण्यात अचूक पकडल्या आहेत. त्यामुळे हे गाणे केवळ ऐकायला नाही, तर पाहायला आणि अनुभवायला देखील मजेदार आहे. चित्रपटाचा एकूण मूड, विनोद आणि कौटुंबिक भावनांचा समतोल हे गाणे सुरुवातीलाच ठळकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.

 

या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा दमदार आणि उत्साही आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक आणि मस्ती अधिक जिवंत वाटते. कुणाल-करण यांचे संगीत हे या गाण्याचे खास आकर्षण ठरते. पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी गाण्याला अशी चाल दिली आहे की, ती पहिल्याच ऐकण्यात लक्षात राहाते आणि नकळत गुणगुणायला भाग पाडते. ठेका, शब्द आणि सूर यांचा ताळमेळ गाण्याला अधिक खुसखुशीत आणि रंगतदार बनवतो.

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो

गीतलेखन वलय मुलगुंड यांचे असून त्यांच्या शब्दांतून सासू-सुनेच्या नात्यातील खट्याळपणा आणि आपुलकी सहजपणे उमटते. साधे, बोलके आणि लक्षात राहाणारे शब्द गाण्याला अधिक प्रभावी बनवतात. गाण्यात निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे पारंपरिक नऊवारी साडीत कमाल दिसत असून त्यांची धमाल केमिस्ट्री आणि सहज अभिनय गाण्याच्या मस्तीला आणखी उठाव देतो. एकूणच हे गाणे ऐकायला जितके मजेदार आहे, तितकेच त्याचे सादरीकरणही लक्षवेधी ठरते.

गाण्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, ‘’सासू-सुनेचे नाते हे कायमच रंजक, गंमतीशीर आणि भावनिक असते. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या गाण्यात आम्ही त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने मांडली आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल आणि प्रत्येक मंगळागौर कार्यक्रमात ते वाजेल, याची मला खात्री आहे.” झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. पटकथा वैशाली नाईक यांची असून, छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा धमाल चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: The first title song from the marathi film aga aga sunbai kay mhantaay sasubai has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो
1

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो

अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मायसभा’चे स्क्रीनिंग, कलाकारांची लागणार उपस्थिती
2

अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मायसभा’चे स्क्रीनिंग, कलाकारांची लागणार उपस्थिती

”लक्ष्मी निवास’ मालिकेने बदललं आयुष्य..’ मेघन जाधवची वर्षअखेरची भावुक पोस्ट, अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी
3

”लक्ष्मी निवास’ मालिकेने बदललं आयुष्य..’ मेघन जाधवची वर्षअखेरची भावुक पोस्ट, अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच
4

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.