Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चा टीझर करतोय धमाल! ‘या’ दिग्गज अभिनेत्री झळकणार एकत्र

मराठी सिनेमा सध्या चर्चेत आहे आणि अशातच आता आणखी एका आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे, ज्याचे नाव आहे 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'. या चित्रपटामध्ये सासू-सुनेची कमाल जोडी पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 15, 2025 | 12:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘अगं अगं सूनबाई…’ चा टीझर करतोय धमाल
  • ‘या’ दिग्गज अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
  • कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
 

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओजचा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला होता, तो म्हणजे ही जोडी आहे तरी कोणाची? आणि आता या प्रश्नाचं उत्तर देत, मनोरंजनाची पूर्ण तयारी करत चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टिमने मुंबईतील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेत, चित्रपटाच्या टिझरचे आणि पोस्टरचे अनावरण झाले आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार असून, सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि तितकीच खमंग जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्किल संवाद आणि भावनिक क्षण यांचा सुरेख मेळ पाहायला मिळणार आहे. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत आहे, तर निर्मिती सावंत पारंपरिक, ठाम मतांच्या आणि अनुभव संपन्न सासूबाईंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेणार आहेत.

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले

दोन पिढ्या, दोन विचारधारा आणि दोन कणखर स्त्रिया यांच्यातील नात्याचं गोड–तिखट, हलकंफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं की, ”प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते”, परंतु एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली तर, ती नाती किती बळकट होऊ शकतात, हाच विचार हा चित्रपट अतिशय सहज आणि प्रभावीपणे मांडतो.”

 

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले, ”ही कथा आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आहेत, स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद होतात, नोकझोक होते, परंतु त्याचबरोबर दोघींच्या समजूतदारपणाची आणि त्यांच्या तरल नात्याची सुंदर कहाणी यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, ही भावना या चित्रपटाचा गाभा आहे.”

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation

कधी हसवणारी तर कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासू सुनेच्या नात्यातील बंध उलगडणारी ही कथा, दोन पिढ्यातील स्त्रियांच्या नातेसंबंधाचं सामर्थ्य अधोरेखित करते. टीझर पाहून एक गोष्ट मात्र नक्की, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट सासू–सुनेच्या नात्याची एक नवी, ताजीतवानी आणि विचारप्रवर्तक ओळख देणारा आहे.

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या १६ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: The teaser for aga aga sunbai kay mhanta sasubai is creating a buzz prarthana behere and nirmiti sawant will be seen together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation
1

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले
2

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले

Lionel Messi ला भेटण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी झाले वेडे; टायगर श्रॉफला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
3

Lionel Messi ला भेटण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी झाले वेडे; टायगर श्रॉफला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

‘करा थोडं जास्त काम, काय होईल…’ दीपिका पदुकोणच्या शिफ्ट टायमिंगच्या वादानंतर रणवीर सिंगचा VIDEO चर्चेत
4

‘करा थोडं जास्त काम, काय होईल…’ दीपिका पदुकोणच्या शिफ्ट टायमिंगच्या वादानंतर रणवीर सिंगचा VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.