Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

जितेंद्र जोशी अभिनित मराठी चित्रपट 'मॅजिक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच चित्रपटाचा ट्रेलर बॉलीवूडचे भाईजान सलमान खान यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 22, 2025 | 12:43 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’
  • अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच
  • ‘मॅजिक’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

आजवर अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात ‘मॅजिक’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. मॅजिक या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत दिसणार असून, १ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान यांच्या हरते लाँच करण्यात आले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’ काय आहे, असा प्रश्न या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरनं निर्माण केला आहे. नुकताच बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सायकोलॉजिकल पद्धतीनं गोष्ट उलगडणारा ‘मॅजिक’ हा चित्रपट नव्या वर्षात, १ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

“द वायर” फेम अभिनेता James Ransone यांचे निधन, वयाच्या 46 व्या वर्षी झाले निधन

तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘आई कुठे काय करते’सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांची छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे.

रक्ताने माखलेला चेहरा, अन् रूद्र अवतार; ‘Mysaa’ मध्ये दिसणार रश्मिका मंदान्नाचं नवं रूप, समोर आली पहिली झलक

एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने केलेला एन्काउंटर आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची गोष्ट “मॅजिक” या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. एन्काऊंटर केल्यानंतर हा पोलिस अधिकारी गावी येतो, पण एक मुलगी तिथं पोहोचते आणि मग सुरू होतो एक वेगळा खेळ… हे नेमकं प्रकरण काय आहे, एन्काऊंटर आणि अत्तर यांचा काय संबंध असतो, ती मुलगी नेमकी कोण आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रचंड गुंतागुंत, सायकोलॉजिकल गोष्ट, उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक आणि महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला ‘मॅजिक’ हा चित्रपट १ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: The trailer of jitendra joshi marathi movie magic was launched by superstar salman khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Salman Khan

संबंधित बातम्या

रक्ताने माखलेला चेहरा, अन् रूद्र अवतार; ‘Mysaa’ मध्ये दिसणार रश्मिका मंदान्नाचं नवं रूप, समोर आली पहिली झलक
1

रक्ताने माखलेला चेहरा, अन् रूद्र अवतार; ‘Mysaa’ मध्ये दिसणार रश्मिका मंदान्नाचं नवं रूप, समोर आली पहिली झलक

“द वायर” फेम अभिनेता James Ransone यांचे निधन, वयाच्या 46 व्या वर्षी झाले निधन
2

“द वायर” फेम अभिनेता James Ransone यांचे निधन, वयाच्या 46 व्या वर्षी झाले निधन

Kalyan Padala ठरला Bigg Boss Telugu 9 चा विजेता; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम
3

Kalyan Padala ठरला Bigg Boss Telugu 9 चा विजेता; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

‘धुरंधर’ मधील ‘या’ सुपरहिट गाण्यासाठी तमन्ना होती पहिली पसंती, परंतु, आदित्य धरने केले रिजेक्ट; नेमकं कारण काय?
4

‘धुरंधर’ मधील ‘या’ सुपरहिट गाण्यासाठी तमन्ना होती पहिली पसंती, परंतु, आदित्य धरने केले रिजेक्ट; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.