Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, कौटुंबिक नात्यांची, रहस्याची आणि हसवणुकीची भन्नाट मेजवानी!

21 नोव्हेंबर 2025 ला प्रदर्शित होत असलेल्या ‘स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर बगलामुखी देवी, नलखेडा, मध्य प्रदेश येथे लॉन्च करण्यात आला

  • By अमृता यादव
Updated On: Nov 03, 2025 | 06:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या उत्साहाची लाट निर्माण करत ‘स्मार्ट सुनबाई’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आकर्षक दृश्यरचना, प्रभावी संवाद आणि नात्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी कथा या ट्रेलरमधून झळकते. महाराष्ट्रीय सण-उत्सवांच्या रंगांनी सजलेलं वातावरण, रहस्याची झलक, कौटुंबिक विनोद आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना कधी हसवते तर कधी विचार करायला लावते. विशेष म्हणजे या ट्रेलरचं लाँच सर्व टीमच्या उपस्थितीत बगलामुखी देवी मंदिर, नलखेडा, मध्य प्रदेश येथे प्रदर्शित करण्यात आला .

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित ‘स्मार्ट सुनबाई’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण कौटुंबिक मेजवानी ठरणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. चित्रपटातील रोमँटिक गीतांचा गोडवा या कथेला नव्या रंगात रंगवतो आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं भावविश्व निर्माण करतो. हसवणूक, रहस्य आणि कौटुंबिक नात्यांच्या गुंतागुंतीच्या वातावरणातही या सुरेल गाण्यांनी प्रेम आणि भावना यांची एक सुंदर छटा निर्माण केली आहे. प्रत्येक गाणं हे कथानकाच्या प्रवाहाशी घट्ट जोडलेलं असून, ते पात्रांच्या भावनांना अधिक खोली देतं.

अगस्त्य नंदा, कार्तिक आर्यन भिडणार; कधी प्रदर्शित होणार ‘तू मेरी मैं तेरा’ आणि ‘इक्कीस’?

‘स्मार्ट सुनबाई’ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकारांची झगमगती फळी एकत्र आली आहे. संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, सायली देवधर, मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर, प्राजक्ता गायकवाड, उषा नाईक, अंशुमन विचारे, स्नेहल शिदम, विनम्र बाबल, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, मोनिका बंगाळ, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार, कांचन चौधरी या कलाकारांच्या दमदार उपस्थितीमुळे चित्रपटाला भव्यतेची झळाळी प्राप्त झाली आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि स्क्रीनवरील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच मोहून टाकेल.


Jiohotstar वरील ‘AI महाभारत’ला चूक पडली महागात, आधुनिक टचमुळे चाहत्यांचा संताप

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी प्रभावीपणे साकारले असून, विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या चित्रपटाला सुरेल संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या सुंदर लेखणीतून उमटलेली गाणी, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या मधुर आवाजाने सजलेली ही संगीतमय मेजवानी ‘स्मार्ट सुनबाई’ला एक वेगळीच ओळख देणार आहे.

‘स्मार्ट सुनबाई’ नक्कीच प्रेक्षकांसाठी एक ताजं, रंगतदार आणि पूर्णतः एंटरटेनिंग अनुभव ठरणार आहे. हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: The trailer of the film smart sunbai was launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 06:31 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य
1

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य

Vat Purnima Special: ‘सनई चौघडे’च्या वटपौर्णिमा विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट, जयच्या आयुष्यात येणार मोठं संकट; शर्वरी करणार मदत
2

Vat Purnima Special: ‘सनई चौघडे’च्या वटपौर्णिमा विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट, जयच्या आयुष्यात येणार मोठं संकट; शर्वरी करणार मदत

‘मराठी अभिनेत्री ओळख दाखवत नाहीत, पण हिंदी..’, Prajakta Kulkarniचं वक्तव्य चर्चेत, Shilpa Shettyबद्दल काय म्हणाल्या?
3

‘मराठी अभिनेत्री ओळख दाखवत नाहीत, पण हिंदी..’, Prajakta Kulkarniचं वक्तव्य चर्चेत, Shilpa Shettyबद्दल काय म्हणाल्या?

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं
4

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.