Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘असंभव 80s‘च्या ट्रेंडची कलाकारांना भुरळ! सचित पाटीलच्या चित्रपटाने वाढवली उत्सुकता

‘असंभव’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अनेक रहस्य आणि धक्कादायक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच या चित्रपटामधील नवीन ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 21, 2025 | 03:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • असंभव 80s‘च्या ट्रेंडची कलाकारांना भुरळ
  • सचित पाटीलच्या चित्रपटाने वाढवली उत्सुकता
  • ‘असंभव’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट
 

सध्या सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन ट्रेंड्सची चर्चा सुरु असते. अशातच मराठी चित्रपटसृष्टीत एक अनोखा आणि आकर्षक ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला ‘#असंभव80s’ हा ट्रेंड सेलिब्रिटींपासून ते प्रेक्षकांपर्यंत वेगाने पसरत आहे. हा ट्रेंड प्रत्येक चाहता आणि कलाकार फॉलोव करत आहे.

‘माझे पहिले प्रेम…’, फराह खानने युट्यूबवरील कमाईबद्दल केला मोठा खुलासा

एआयच्या मदतीने ८० च्या दशकातील लूक साकारून या ट्रेंडमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सुमित राघवन, अंकुश चौधरी, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, अभिजीत पानसे, आनंद इंगळे, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोत्री, सुयश टिळक, प्रिया बेर्डे, रेशम टिपणीस, कविता लाड, गौरी कुलकर्णी याच्यासह अनेक कलाकारांनी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या कलाकारांच्या ८०च्या दशकातील लूकवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहे.

‘असंभव80s’ हा ट्रेंड व्हायरल होण्याचे कारण म्हणजे ‘असंभव’ चित्रपटातील ८०च्या दशकातील ग्लॅम लूक हे आहे. चित्रपटातील कलाकारांच्या गेटअपने सर्वांनाच भुरळ घातली आहे. रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर मिळत असलेला प्रतिसाद हा चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहे. चित्रपटातील वेशभूषा, रंगसंगती, सेट डिझाइन आणि कलाकारांचे गेटअप आधीच चर्चेचा विषय झाला आहे.

“धर्माच्या नावाखाली एखाद्याची हत्या करणे…” ए.आर. रहमानने चे विधान चर्चेत, हिंदू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मावर केले भाष्य

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटीलने केले असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. ‘असंभव’ हा चित्रपट आजपासून म्हणजे २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Web Title: The trend from the marathi film asambhav has created a buzz on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले
1

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
2

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
3

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
4

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.