
फोटो सौजन्य सोशल मीडिया
या हल्ल्यात जागेवर ३० जणांचा बेक्कार मृत्यू झाला असून या हल्ल्यामुळे अनेक प्राणीसुद्धा मरण पावले आहेत . यामुळे सुदान मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मृतांमध्ये निष्पाप माणसे मारली गेल्याचे दुःख सगळीकडे व्यक्त होत आहे . आता सुदान मध्ये जवळपास कोणताच असा भाग राहिला नाही कि जो शंभर टक्के सुरक्षित आहे .
World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
सकाळची वेळ होती अनेक नागरिक आपापली जनावरे घेऊन शुक्रवारी मोठ्या संख्येने बाजारात आले होते . तसेच व्यापारी मंडळीही मोठ्या संख्येने जमली होती . य एकमेकांबरोबर सगळ्यांचा सौदा सुरु झाला होता . नेहमीप्रमाणे मार्केट सुरु होते . तेवढ्यात अचानक वरून जोरात आवाज येऊ लागला आणि हा म्हणता म्हणता ड्रोन येऊन बाजारपेठेवर पडला . मोठा धमाका झाला आणि जागेवर ३० जणांचा मृत्यू झाला . तसेच या हल्ल्यात ४७ जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे . RSF च्या प्राथमिक माहिती नुसार या हल्ल्यामध्ये १७ महिला आणि पाच लहान मुलांचाही समावेश आहे .
या हल्ल्यासाठी RSF ने सुदानी लष्कराला जबाबदार धरले आहे . आरोप करताना त्यांनी म्हंटले आहे कि तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर करून बाजारपेठेला लक्ष करण्यात आले आहे . सुदानी लष्कराने न्याला शहरातील RSF ची कमांड सेंटर्स आणि लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचे मान्य केले आहे . मात्र बाजारपेठांवरील हल्ल्याची जबाबदारी स्पष्टपणे स्वीकारलेली नाही . याचा अर्थ दोंघांनीही हल्ले केलेला नाही मग ड्रोन आपोआप गोडाऊनमधून निघाला आणि बाजापेठेवर आदळला आहे . अशी जगातील माणसांची नीतिमत्ता होऊन बसलेली आहे .
एप्रिल २०२३ पासून सुदानमध्ये लष्कर आणि RSF यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे . RSF ही सुरवातीला सुदान सरकारच्या आख्यात काम करणारी निमलष्करी सेना होती नंतर RSF ने सुदान लष्करी सेवेत पूर्णवेळ आणि कायमस्वरूपीचे सैन्य म्हणून मान्यता द्यावी यासाठी मागणी केली . ती मागणी सुदान लष्कराने फेटाळली आणि तेव्हापासून सुरु झाला RSF आणि सुदान लष्कर यांच्यात संघर्ष .
RSF ही काही सामान्य बंडखोर संघटना नाही . ती स्वतंत्र लष्करी ताकद , यंत्रणा आणि राजकीय महत्वकांक्षा असणारी निमलष्करी दल आहे . यांच्या संघर्षात सुदानमधील अर्थव्यवस्था , आरोग्यव्यवस्था आणि सामाजिक जीवन पूर्णपणे उध्वस्त झाले आहे . याच्यात आत्तापर्यंत हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे . लाखो लोकं आपल्याच देशात विस्थपित झालेले आहेत . संयुक्त राष्ट्राच्या मते सुदानमध्ये जगातील सर्वात गंभीर मानवतावादी संकटांपैकी एक संकट निर्माण झाले आहे .